Bihar ANI
देश

भीषण अपघातानंतर पोलिसांच्या गाडीला आग; तिघांचा होरपळून मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

एका ट्रकने पोलिसांच्या गाडीला धडक दिल्यानं तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बिहारमध्ये (Bihar) घडली आहे.

एका ट्रकने पोलिसांच्या गाडीला धडक दिल्यानं तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बिहारमध्ये (Bihar) घडली आहे. या अपघातात इतर दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे. पटनामध्ये हा अपघात झाला. याची माहिती प्रशिक्षणार्थी डीएसपी प्रांजल त्रिपाठी(Pranjal Tripathi) यांनी दिली. पोलिस कर्मचारी गस्त घालण्यासाठी जात होते यावेळी हा अपघात झाला आहे. अपघातात तीन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर आहेत. पटनामधील बेऊर मोड भागात हा अपघात झाला.

प्रांजल त्रिपाठी यांनी सांगितलं की, वेगाने जाणाऱ्या ट्रकवरचे चालकाचे नियंत्रण सुटले. यानंतर ट्रक पोलिसांच्या गाडीला धडकला. या अपघातात जखमी असलेल्या पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिघेजण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर आहेत.

याबाबत आता अशीही माहिती समोर येत आहे की अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर गाडीला आग लागली. या आगीत होरपळून तीन पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गर्दनीबाग पोलिस ठाण्याची गाडी होती, या गाडीचा अपघातात चुराडा झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी अधिकारी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT