Prashant Kishor addressing media after Bihar Assembly election dates were announced, highlighting his views on upcoming political strategies.

 

esakal

देश

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

Prashant Kishor’s major statement after Bihar Assembly election dates announcement : यंदाच्या बिहार निवडणुकीत जन सूराज पक्षाला कशाप्रकारे मतं मिळतील हे देखील प्रशांत किशोर यांनी आताच सांगितलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Prashant Kishor Reacts After Bihar Election Dates Announced : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा झाली. यानंतर आता विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, जन सूराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर  यांनी एक मोठे विधान केलं आहे आणि निवडणूक आयोगाच्या दोन टप्प्यात निवडणुका घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे.

प्रशांत किशोर यांनी दावा केला की जन सूरज एनडीए आणि महाआघाडी दोघांचीही मोठ्याप्रमाणात मतं कमी करेल. तसेच त्यांनी असाही दावा केला की, मागील निवडणुकीत कोणत्याही पक्षाला मतदान न करणारे २८ टक्के लोक यावेळी त्यांच्या जन सूराज पक्षाला मतदान करतील.

यावेळी प्रशांत किशोर यांनी जन सूराज पक्षाच्या विजयाचे गणित स्पष्ट केले आणि सांगितले की, गेल्या वेळी दोन्ही आघाड्यांना म्हणजेच एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीला एकत्रितपणे ७२टक्के मतं मिळाली होती. तर उर्वरित २८ टक्के ज्यांनी कोणत्याही पक्षाला मतदान केले नाही असे होते, हे मतदार आता जन सूराज पक्षाला मतदान करतील.

याशिवाय ते म्हणाले की, विविध सर्वेक्षणांमधून असे दिसून येते की दोन्ही आघाड्यांचे नुकसान होणार आहे. समजा दोन्ही आघाडींनी प्रत्येकी १० टक्के मतं जरी गमावली, तरी ती जन सुराज पक्षाला मिळतील आणि आमचा मतदानाचा वाटा ४८ टक्क्यांपर्यंत वाढेल.

प्रशांत किशोर म्हणाले की त्यांना "मत फोडणारा पक्ष" म्हटले गेले आहे, परंतु ते याला स्वतःसाठी पदक मानतात आणि त्यांनी असंही भाकीत केलंय की, "आम्ही दोन्ही आघाड्याची इतकी मतं कापू की त्या पूर्णपणे साफ होतील.

प्रशांत किशोर यांच्या व्यतिरिक्त बिहार विधानसभेसाठी आम आदमी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी देखील स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. यापैकी आम आदम पार्टीने एक पाऊल पुढे टाकत निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याआधीच, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करून टाकलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : टीम इंडियाला धक्का! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघातून बाहेर, 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा...

Rabies Death in Kolhapur : जयसिंगपुरात ५ जणांना चावलं पिसाळलेलं कुत्र, एका महिलेचा रेबीजने मृत्यू; ७ वर्षांच्या मुलीवरही हल्ला

Latest Marathi News Live Update : भोकरदन निवडणूक तापली! दानवे विरुद्ध देशमुख; प्रतिष्ठेची लढत कोण जिंकणार?

Malegaon Protest : मोठी बातमी ! मालेगाव अत्याचार प्रकरणी जनआक्रोश मोर्चाला हिंसक वळण, आक्रमक आंदोलक गेट तोडून कोर्टात घुसले

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

SCROLL FOR NEXT