Hemant Soren’s Jharkhand Mukti Morcha’s latest political stance adds pressure on RJD ahead of the Bihar Assembly elections.
esakal
Jharkhand Mukti Morcha increases RJD’s tension: हेमंत सोरेन यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा (JMM)ने RJDला १२ जागांची यादी सोपवली आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली की, बिहारमध्ये जेएमएम १२ जगांवर निवडणूक लढवू इच्छित आहे. प्राप्त माहितीनुसार झारखंड मुक्ती मोर्चाला तारापुर, कटोरिया, मनिहारी, झाझा, बांका, ठाकुरगंज, रूपौली, रामपुर, बनमनखी, जमालपुर, पीरपैंती आण चकाई या जागा हव्या आहेत.
तर सूत्रांच्या माहितीनुसार RJD दोनपेक्षा अधिक जागा देण्यास तयार नाही. झारखंड विधानसभा निवडणुकीत जेएमएमने राजदला केवळ सात जागा दिल्या होत्या. आता जेएमएम बिहारमध्ये १२ जागांची मागणी करत आहे. या सर्व जागा त्या जिल्ह्यांमधील आहेत, ज्यांची सीमा झारखंडला लागून आहे.
दुसरीकडे सूत्रांच्या माहितीनुसार जेएमएम नंतर सीपीआय(एमलएल)ने महाआघाडीत टेन्शन वाढवलं आहे. सीपीआय(एमएल) पक्षाने राजदच्या १९ जागांचा प्रस्ताव धुडकावला आहे. पक्ष ३० जागांवर अडून बसला आहे आणि या जागांची यादीही तेजस्वी यादव यांना सोपवली आहे. बिहारमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत सीपीआय(एमएल) लिबरेशन यांनी १९ जागांवर आपले उमेदवार उतरवले होते, ज्यामध्ये १२ जागांवर विजय मिळवला होता.
दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारांमध्ये अनुसूचित जातींमधील सात, अतिमागास वर्गातील १७, मागासवर्गातील ११, अल्पसंख्याक समाजातील आठ आणि सर्वसाधारण गटातील आठ जणांचा समावेश आहे.
पक्षाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच जनसुराज पक्ष निवडणूक लढवित आहे. राजकीय रणनितीकार आणि जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी निवडणूक लढविण्यासाठी वर्गणी देण्याचे आवाहन केले असून त्यासाठी मोहिमही सुरू केली.