esakal
देश

Bihar Assembly Election : बिहार निवडणुकीसाठी I.N.D.I.A आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र ठरले? ; लवकरच घोषणा!

INDIA Alliance Seat Sharing : जाणून घ्या, राजद आणि काँग्रेसच्या वाट्याला किती जागा आल्या आहेत.

Mayur Ratnaparkhe

INDIA Alliance Finalizes Seat Sharing Formula in Bihar : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही पक्षाने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे, तर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांचे जागा वाटप अद्याप जरी अधिकृतरित्या जाहीर झालेले नसले, तरी दोन्ही आघाड्याचे जागा वाटपाचे सूत्र हे निश्चित झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे. 

प्राप्त माहितीनुसार इंडिया आघाडीचे जागा वाटप निश्चित झाले असून, ते कधीही जाहीर होवू शकते. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात सूत्रांच्या माहितीनुसार महाआघाडीत कोणत्या राजकीय पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत.

राजद – १३४-१३५, काँग्रेस – ५४-५५, एमएल- २१-२२, सीपीआय – ०६, सीपीआय -०४, व्हीआयपी- १५-१६, जेएमएम, आरएलजेपी, आयआयपी मिळून सहा ते सात जागा.

सूत्रांच्या माहितीनुसार, महाआघाडी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्याबरोबरच तीन उपमुख्यमंत्र्यांचीही घोषणा करू शकते. आज(शनिवार) रात्रीपर्यंत या जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब होवून, रविवारी सकाळी अथवा मंगळवारी याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

सूत्रांच्या माहितीनुसार, महाआघाडीत जवळपास दहा ते बारा जागा सोडल्या तर ९५ टक्के जागांवर एकमत झाले आहे. अधिकच्या जागांच्या अदलाबदलीवर घोळ कायम आहे. काँग्रेसच्य काही जागांवर राजदने दावा केला आहे. राजदच्या या भूमिकेमुळे काँग्रेस अस्वस्थ आहे, परंतु त्यांच्याकडे सध्या कोणताही पर्याय नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT