Jharkhand Mukti Morcha leaders announce independent contest for Bihar Assembly Election, signaling a major challenge to INDIA Alliance’s unity.
esakal
Jharkhand Mukti Morcha to contest Bihar Assembly Election independently: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांच्या आणि आघाड्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. अशावेळी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला निवडणुकीआधीच मोठा झटका बसल्याचे समोर आले आहे.
कारण, आधीच आम आदम पार्टी या मित्र पक्षाने बिहार विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केलेली असताना आणि याचबरोबर एमआयएम, बसपा हे पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात स्वबळावरच असताना आता विरोधी पक्षांच्या या आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चाने देखील स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा हा पक्ष बिहारमध्ये चकाई, धमदाहा, कटोरिया, पिरपैंती, मनीहारी, जमुईपर या सहा जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर हेमंत सोरेन यांच्या या निर्णय़ामुळे राष्ट्रीय जनता दल आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो. अद्याप तरी महाआघाडीकडून उमेदवारी याद्या जाहीरच केल्या जात आहेत.
खरंतर याआधी हेमंत सोरेन यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा (JMM)ने RJDला १२ जागांची यादी सोपवली असल्याची माहिती समोर आली होती. झारखंड मुक्ती मोर्चा बिहारमध्ये १२ जगांवर निवडणूक लढवू इच्छित असल्याचे बोलले जात होते. तारापुर, कटोरिया, मनिहारी, झाझा, बांका, ठाकुरगंज, रूपौली, रामपुर, बनमनखी, जमालपुर, पीरपैंती आण चकाई या जागा झारखंड मुक्ती मोर्चाला हव्याच होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.