Bihar BJP MLC Sunil Kumar Singh dies of COVID-19 
देश

धक्कादायक ! भाजपच्या विधानपरिषद आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू

अशोक गव्हाणे

पटना : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनाच्या कचाट्यातून लहान मोठी, गरीब श्रीमंत अशी कुठलीच व्यक्ती सुटु शकलेली नाही. अशात एक धक्कादायक गोष्ट समोर आली असून भारतीय जनता पक्षाच्या एका विधानपरिषद आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाशी झुंजत असलेले बिहारमधील भाजप आमदार सुनिल कुमार सिंह यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे व एक मुली असा परिवार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे बिहारमध्ये कुठल्या मोठ्या नेत्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यांच्या निधनाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ६६ वर्षीय सुनील कुमार सिंह यांच्यावर पाटणा येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना शुगर आमि हायपरटेंशनचा त्रास होता. अखेरच्या काळात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 

सुनिल कुमार सिंह हे बिहार विधान परिषदेमध्ये दरभंगामधील स्थानिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना १३ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांत बिहारमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत असतानाच राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

बिहारमध्ये आतापर्यंत मंत्री विनोद कुमार सिंह, भाजप आमदार जिबेश कुमार मिश्रा, काँग्रेस आमदार आनंद शंकर सिंह, राजद आमदार शाहनवाझ आलम आणि जेडीयू आमदार खालिद अन्वर यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT