CM Niitsh Kumar Meets Governer
CM Niitsh Kumar Meets Governer Esakal
देश

Bihar Politics: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांच्या भेटीला

अंकिता खाणे (Ankita Khane)

बिहारमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. बिहारच्या राज्यपालांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार अचानक राजभवनात पोहोचले. सध्या जेडीयूचे ज्येष्ठ नेते विजय चौधरी हेही मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. राजभवनात पोहोचण्यापूर्वी सीएम नितीश यांनी एका सरकारी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. येथून त्यांनी थेट राजभवन गाठले.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांची राज्यपालांसोबत गेल्या अर्धा तासांपासून बैठक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नितीश यांनी राज्यपालांशी कशा संदर्भात भेट घेतली आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नितीश यांच्या अचानकपणे राज्यपालांकडे जाण्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. कारण, काही दिवसांपासून नितीश पुन्हा एनडीएमध्ये जातील अशी अटकळ होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर या अटकळांना जोर आला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी जेडीयू आणि नितीश कुमार एनडीएमध्ये परतण्याच्या शक्यतेवर भाष्य केले. त्यांना विचारण्यात आले की, नितीशकुमारांसाठी एनडीएचे दरवाजे अजूनही खुले आहेत का? त्याला उत्तर देताना गृहमंत्री शाह म्हणाले- प्रस्ताव आला तर त्यावर विचार करू.

अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

अमित शहांच्या त्या वक्तव्यानंतर बिहारच्या राजकीय वर्तुळात जेडीयू आणि आरजेडी यांच्यातील कटुतेची चर्चा सुरू झाली होती. तेव्हा बिहारचे भाजप नेते संजय सरावगी म्हणाले होते, 'सध्या नितीश काँग्रेस, लालू आणि तेजस्वी यांच्यासोबत INDIA आघाडीत आहेत. या आघाडीला भविष्य नाही. नितीशकुमार यांनी भाजपचे सदस्यत्व घेऊन पक्षात प्रवेश केला तर आम्ही त्यांचे स्वागत करण्यास तयार आहोत. जागावाटपावरून INDIA आघाडीत भांडण सुरू आहे.

नितीश यांनी कधी-कधी बदलली युती?

1. आज लालू प्रसाद यादव यांच्या पक्ष राष्ट्रीय जनता दल (RJD) च्या सहकार्याने बिहारमध्ये सरकार चालवत असलेल्या नितीश कुमार यांनी 1994 मध्ये बिहारमधील जनता दलावर लालू यादव यांच्या नियंत्रणा विरोधात बंड केले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये भागीदार बनलेल्या समता पक्षाची स्थापना करण्यासाठी त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी युती केली.

2. 2013 मध्ये, जेव्हा भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली तेव्हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू एनडीएपासून वेगळे झाले. त्यानंतर नितीशकुमार यांनी भाजपसोबतची १७ वर्षे जुनी युती एका झटक्यात संपवली.

3. एनडीएपासून वेगळे झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी, 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीने बिहारच्या राजकारणात आणखी एक मोठा बदल घडवून आणला. त्यानंतर नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेससोबत 'महाआघाडी' केली.

4. एकीकडे काँग्रेस आणि आरजेडी महाआघाडीसोबत जाण्याची स्वप्ने पाहत होते, तर जेडीयूने आरजेडीशी मतभेद झाल्यामुळे बिहारमधील महाआघाडीचे सरकार सोडले. ऑगस्ट 2017 मध्ये, नितीशची जेडीयू पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाली.

5. लालू कुटुंबावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर, नितीश यांनी 2022 मध्ये पुन्हा एकदा भाजपसोबतच्या मतभेदामुळे NDA सोडला. यानंतर नितीश यांनी पुन्हा महाआघाडीसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर नितीश यांचे एनडीएशी अनेक मुद्द्यांवरून मतभेद झाले. त्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेवरही याचा परिणाम होत होता.

जेडीयूकडून काँग्रेसबाबत वक्तव्य आले समोर

याआधी जेडीयू एमएलसी खालिद अन्वर यांचे विधान समोर आले होते, ज्यात त्यांनी नितीश कुमार राहुल गांधींच्या जाहीर सभेला उपस्थित राहणार असल्याचा काँग्रेसचा दावा फेटाळून लावला होता. खालिद म्हणाले होते की, आतापर्यंत नितीश कुमार यांना काँग्रेसकडून अधिकृत निमंत्रण मिळालेले नाही. नितीश यांच्या सहभागावर काँग्रेसने दावा कसा केला ते कळत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT