Nitish Kumar sakal
देश

नितीश कुमार सतत बॉयफ्रेंड बदलणाऱ्या महिलेसारखेच; भाजपा नेत्याचं विधान

नितीश कुमार यांना पलटुराम म्हणूनही ओळखलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पलटुराम नावाने ओळखलं जातं. सतत पक्ष बदलणं, युती बदलणं, अशा सगळ्यामुळे त्यांना मिळालेल्या या खोचक विशेषणाची सध्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. नितीश कुमार यांनी भाजपासोबतची युती तोडल्याने भाजपाने त्यांना टोला लगावला आहे. (Nitish Kumar)

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाजपसोबतची युती संपुष्टात आणून महागठबंधनाशी हातमिळवणी केल्याची टीका केली आहे. त्यामुळे आता वादाला तोंड फुटलं आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी नितीश कुमार यांची तुलना सतत बॉयफ्रेंड बदलणाऱ्या मुलीशी केली आहे.

कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, जेव्हा मी काही दिवस परदेशात होतो, तेव्हा कोणीतरी सांगितलं की इथल्या स्त्रिया कधीही त्यांचे बॉयफ्रेंड बदलतात. बिहारचे मुख्यमंत्रीही असेच आहेत. ते कोणाचा हात धरतात कोणाचा सोडतात काही कळत नाही.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर विजयवर्गीय यांचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, “महिलांचा आदर दाखवणारे भाजप सरचिटणीसचे उदाहरण”. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी NDA युती सरकारपासून फारकत घेतली आणि JD(U) आणि भाजप यांच्यातील काही आठवड्यांच्या तणावानंतर RJD, कॉंग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी केली. गेल्या आठवड्यात, नितीश कुमार यांनी राजदच्या पाठिंब्याने नितीश कुमारांनी सरकार स्थापन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: पालकांनो! 'ORS' बाबत अजूनही बाळगा सतर्कता; डॉक्टरांनी दिला इशारा- योग्य ओळखूनच मुलांना द्या!

Cricketer Dies: धक्कादायक! T20 सामन्यापूर्वी १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने गमावले प्राण, डोक्याला लागलेला चेंडू

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

बघंल कोणीतरी आम्ही नाही जा! सुकन्या मोनेंनी सादर केली ठसकेबाज लावणी, सोशल मीडियावर Video Viral

Vaibhavwadi Rural Hospital : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा, २५ वर्षीय तरूणीचा हकनाक बळी; नातेवाईकांच्या आरोपांमुळे तणाव

SCROLL FOR NEXT