Bihar floor test Nitish Kumar has majority
Bihar floor test Nitish Kumar has majority 
देश

Nitish Kumar has majority: नितीश कुमारांनी बहुमत केलं सिद्ध; बिहारमध्ये जेडीयू-एनडीए सरकारवर शिक्कामोर्तब

कार्तिक पुजारी

पाटणा - बहुमत चाचणीमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जनता दल (युनायटेड) आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी 122 आमदारांची आवश्यकता होती. नितीश कुमार यांना 129 आमदारांचे समर्थन मिळाले आहे. त्यामुळे बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. (Bihar floor test Nitish Kumar has majority Janata Dal United BJP alliance win trust vote support of MLAs)

भाजपचे तीन आमदार भागीरथी देवी, रश्मी वर्मा आणि मिश्री लाल हे विधानसभेत आले नव्हते. त्यामुळे वेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. विधानसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी प्रस्ताव समोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर अध्यक्षांना पदावरुन हटवण्यात आले. सर्व आमदार एकजूट असल्याचा दावा नितीश कुमार यांनी यापूर्वी केला होता. आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले होते.

लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीचे अवध बिहारी चौधरी यांना बिहारच्या विधानसभा अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे. त्यांना हटवण्याच्या बाजूने १२५ मते पडली तर विरोधात ११२ मतं पडली. त्यानंतर बहुमत चाचणीला सुरुवात झाली . दरम्यान, आरजेडीचे तीन आमदार पलटले आहेत. ते नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए गटाच्या जागी जाऊन बसले आहेत. त्यामुळे महागठबंधनसाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्याकडे स्पष्ट बहुमत होतं.

प्रस्तावावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर टीका केली. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मिळाला याबाबत मी आनंदी आहे. पण, भाजपने त्यांना भारतरत्न देऊन डील केली आहे. तुम्ही आमच्या सोबत या. तुम्हाला भारतरत्न देतो अशी ती डील होती, असं आरोप यादव यांनी विधानसभेत बोलताना केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT