mewalal chaudhari 
देश

बिहारमध्ये नितीश सरकारला धक्का; नवनियुक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा

पाटणा - बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेल्या एनडीएने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं. या मंत्रिमडळाचा शपथविधी 16 नोव्हेंबरला झाला. दरम्यान, तीनच दिवसात नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील नवनियुक्त शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. डॉक्टर मेवालाल चौधरी यांनी गुरुवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. विषेश म्हणजे गुरुवारीच त्यांना पदभार स्वीकारला आणि राजीनामा दिला. त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने हा राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. 

भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेले शिक्षण मंत्री मेवालाल चौधरी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली. या बैठकीत काय घडलं याबद्दल वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवार पदभार स्वीकारल्यानंतर मेवालाल चौधरी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मेवालाल चौधरी यांच्यावर सबौर विद्यापीठाचे कुलपती असताना भरती घोटाळा केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. 

मेवालाल चौधरी 2015 मध्ये पहिल्यांदा जदयूकडून आमदार म्हणून निवडून आले होते. त्याआधी त्यांनी शिक्षण देण्याचं काम केलं होतं. कुलपती असताना कृषी विद्यापीठात 2012 मध्ये सहाय्यक प्राध्यपक आणि ज्यूनिअर वैज्ञानिकांची भरती झाली होती. या नियुक्त्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप कऱण्यात आला होता.

कृषी विद्यापीठातील भरती घोटाळ्याप्रकरणी सबौर पोलिस ठाण्यात 2017 मध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना अंतरिम जामिन दिला होता. दरम्यान, आतापर्यंत त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT