तेजप्रताप यादव Sakal
देश

मामा साधु यादव हे तर ‘कंस’; तेजप्रताप यांचा उलटवार

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांच्या नुकत्याच झालेल्या विवाहावरून कुटुंबातील वाद चव्हाट्यावर येत आहेत.

उज्वलकुमार

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांच्या नुकत्याच झालेल्या विवाहावरून कुटुंबातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. तेजस्वी यांचे मामा साधु यादव यांनी विवाहाविरोधात आगपाखड केल्यानंतर तेजस्वी यांचे बंधू तेजप्रताप यादव यांनी मामांना ‘कंस’ ठरवत धमकी दिली.

तेजस्वी यांनी रॅचेल या मैत्रिणीबरोबर विवाह केला आहे. या विवाहाला कुटुंबीयांचा सुरुवातीला विरोध होता, असे काही जणांचे म्हणणे आहे. मात्र विवाहावेळी वाद मिटून तो संपन्न झाला. त्यानंतर साधु यादव यांनी तेजस्वी यांना लक्ष्य केले. ‘हा विवाह म्हणजे बिहारचा अपमान आहे. तेजस्वी, तेजप्रताप यांच्याविरोधात मी आता प्रचार करणार असून ते दोघे कधीही आमदार बनू शकणार नाहीत,’ असे विधान साधु यादव यांनी केले होते.

त्यावरून तेजप्रताप म्हणाले, हे मामा पाटण्यात आले तर मारून मारून त्यांचे हालत खराब करून टाकेन.

आमच्या परिवाराबाबत बोलण्याची मामांची हिम्मत कशी झाली? लालूंच्या काळात साधु यांनी कोट्यवधींची माया जमविली आणि बदनाम मात्र लालू झाले. माझ्या समोर उभे राहण्याचीही साधु यांची लायकी नाही. त्यांची लायकी त्यांना दाखवून देईन.

- तेजप्रताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''होर्मुझ' आता आम्ही चालवणार'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान, अनेक देशांकडून टोल वसुली करण्याचा मनोदय

Pick Up Scooty Accident : भरधाव पिकअपची स्कुटीला धडक; खिर्डी येथील तरुणाचा मृत्यू, एक जखमी

Pune Crime : बोपदेव घाट अत्याचार प्रकरण; आरोपी घाटात आल्यापासून ते कोणत्या मार्गाने पळून गेल्याची साक्ष नोंदवली

Khamgaon News : खामगावात पॅथॉलॉजीस्‍ट डॉक्‍टरचा संशयास्‍पद मृत्‍यू; शरीरावर आढळल्या जखमा

Manchar Accident : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला; एसटीच्या धडकेत अकरावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT