Nitish Kumar and Modi election
देश

Bihar NDA Seat Sharing : बिहारमध्ये 'NDA'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; JDU, BJP किती जागा लढवणार?

NDA alliance and Bihar Election : याशिवाय एनडीए आघाडीतील कुशवाहा, मांझी, चिराग पासवान यांच्याही पक्षास मिळालेल्या जागांची माहिती समोर आली आहे.

Mayur Ratnaparkhe

Bihar Elections 2025 : बिहारमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबतची सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी एनडीए आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

बिहारमध्ये एनडीएत एकूण पाच पक्ष आहेत. भाजप आणि जेडीयू व्यतिरिक्त चिराग पासवान यांचा पक्ष, जीतन राम मांझी यांचा पक्ष आणि उपेंद्र कुशवाह यांचा पक्ष यांचाही एनडीए आघाडीत समावेश आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या पाच पक्षांमध्ये जागावाटप निश्चित झाले आहे. 

एका वृत्तावाहिनीने हे वृत्त दिले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार देखील अलीकडेच दिल्लीला गेले होते. दरम्यान, जागांचा हा आकडा आता समोर आला आहे. जेडीयूला जास्त जागा देऊन, एनडीए नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू सर्वाधिक जागा लढवेल. बिहारमधील २४३ जागांपैकी जेडीयूला १०२ जागा देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय जनता पक्ष यावेळी १०१ जागांवर निवडणूक लढवेल. तर, चिराग पासवान यांच्या पक्ष एलजेपीला २० जागा देण्यात आल्या आहेत. याशिवाय, जितन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांना प्रत्येकी १० जागा देण्यात येतील, यामध्ये एक किंवा दोन जागा वाढू किंवा कमी होऊ शकतात.

तथापि, या आकड्यांबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. जागांच्या वाटपाबाबत लवकरच घोषणा केली जाईल हे देखील निश्चित आहे. अशा परिस्थितीत, बिहारमध्ये एनडीए आघाडीच्या जागावाटपाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे असे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Arya Encounter: 'बाथरुम'मधून पोलिस आत शिरले अन्.., कसा घडला किडनॅपरच्या एन्काऊंटरचा थरार?

IND vs AUS Semi Final : २२ वर्षीय Phoebe Litchfield भारी पडली; पेरी, गार्डनर यांची तुफानी खेळी, भारतासमोर ३००+ धावांचे लक्ष्य

Latest Marathi News Live Update : राजवी अॅग्रो पाॅवर प्रा. लि. या साखर कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामात ३००१ रूपये प्रति मेट्रिक टन उस दर जाहीर केला

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

...म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मुंबई कायमची सोडली; स्वतः कारण सांगत म्हणाली, 'मी जुहूवरुन सगळीकडे...'

SCROLL FOR NEXT