देश

नितीश कुमार सहाव्यांदा भाजपच्या पाठिंब्यावर बिहारचे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था

पाटणा : लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला धक्का देत महाआघाडीतून अचानक बाहेर पडत नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

बिहारची राजधानी पाटणा येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी समारंभात नितीश कुमार यांच्या पाठोपाठ त्यांचे आतापर्यंतचे कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली हे या समारंभाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध नितीशकुमार या संघर्षाला बुधवारी सायंकाळी निर्णायक वळण मिळाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या 'अंतरात्म्याचा आवाज' ऐकत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय भूकंप झाला.

महाआघाडी तुटल्यानंतर वेगाने चक्रे फिरली व भारतीय जनता पक्षाने नितीशकुमार यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावरील नवे सरकार सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज (गुरुवार) सकाळी दहा वाजता नितीशकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीमध्ये नितीशकुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. राजभवनाला तसे पत्र पाठविण्यात आले. संयुक्त जनता दलालाही याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. नितीशकुमार यांनी मध्यरात्री राज्यपालांची भेट घेऊन भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा दावा केला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT