विषारी दारूमुळे १८ जणांचा मृत्यू sakal
देश

पाटणा : विषारी दारूमुळे १८ जणांचा मृत्यू

विषारी दारू प्यायल्याने गेल्या २४ तासांत १८ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण आजारी पडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : बिहारमधील गोपालगंज आणि पश्चिम चंपारण जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने गेल्या २४ तासांत १८ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण आजारी पडले आहेत. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी लोकांना विषारी दारू पाजण्यात आली असल्याचा आरोप मंत्री जनक चामर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून केला आहे.

विषारी दारूने १८ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले असले तरी यासंदर्भात अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करण्याची सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका आहे. आजारी पडलेल्यांवर रुग्णालयांत उपचार सुरू असून काहींची दृष्टी गेली आहे. बिहारमध्ये दारूबंदी असूनही पोलिसांच्या संरक्षणात दारूची विक्री होत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे.

‘चिंताही नको, चिंतनही नको’

राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. ‘‘मुख्यमंत्रीजी, हे आहे तुमच्या दारूबंदीचे क्रूर सत्य. पण तुम्हाला चिंताही नको आहे आणि चिंतनही करायचे नाही. तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत. जनतेशी तुम्हाला काही देणेघेणे नाही,’’ अशी टीका त्यांनी ट्विटरवरुन केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT