Bihar Police esakal
देश

निवडणूक प्रचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला

सकाळ डिजिटल टीम

पाटणामध्ये पोलीस पथकावर मोठा हल्ला झाला असून यात 23 पोलीस जखमी झाले आहेत.

पाटणा (बिहार) : पाटणामध्ये (Patna) पोलीस पथकावर मोठा हल्ला झाला असून पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय, तर एका निरीक्षकासह 23 पोलीस जखमी (Bihar Police) झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निवडणूक प्रचार थांबवण्यासाठी गेले होते, असंही सांगण्यात येतंय.

शुक्रवारी रात्री पाटणाच्या धनरुआमध्ये ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली. यावेळी बचावासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान, गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास 23 पोलीस जखमी झाले असून परिमंडळ निरीक्षक व धनरुआ ठाण्याचे पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. यात काही पोलिसांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येतंय. अहवालानुसार, पोलिसांनी त्यांच्या बचावासाठी सुमारे 30-40 राऊंड गोळीबार केला.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना धनरुआच्या मोरियावा गावातील आहे. या गावात उमेदवार प्रचाराची वेळ (पाच वाजता) संपल्यानंतरही परिसरात प्रचार करत होता. याची खबर धनरुआ पोलीस ठाण्याला लागताच, ते प्रचार थांबवण्यासाठी तिथं पोहोचले. त्यावेळी पोलीस पथकाची संख्या खूपच कमी होती. दरम्यान, प्रमुख उमेदवार आणि त्यांच्या मुलानं त्यांच्या समर्थकांना भडकावत पोलीस पथकावर हल्ला चढवला. त्यावेळी स्वत: चा जीव वाचवून पोलिसांचे पथक पुन्हा पोलिस ठाण्यात परतले. या घटनेची संपूर्ण माहिती पोलीस पथकानं वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली, त्यानंतर अधिकारी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा फौजफाटा पाहून ग्रामस्थ संतापले. यावेळी गोळीबारही करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver : साताऱ्यातील 31,556 शेतकरी पात्र! अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी 'येथे' पाहा

Mumbai Crime: लोक भवनाच्या नावाखाली रेल्वे तिकीट घोटाळा! खोटे शिक्के अन् राज्यपालांची बनावट सही, सूत्रधारासह ३ रेल्वे एजंट अटकेत

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! फिटमेंट फॅक्टरवर सरकारने पहिल्यांदाच मांडली अधिकृत भूमिका; संसदेत काय सांगितले?

Latest Marathi News Live Update : पुढील चोवीस तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Prashant Kishor: "माझ्याच पोलीस ठाण्यात मला धमक्या, एकदा वर्दी काढली तर..."; SHO अन् प्रशांत किशोर यांच्यात वाद, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT