Bird Flu  
देश

आता दहशत Bird Flu ची ! दिल्लीत कावळ्यांचा मृत्यू दर वाढतोय; सॅम्पल लॅबमध्ये पाठवले

सकाळ ऑनलाईन टीम

कोरोनाच्या संकटानंतर देशात आता बर्ड फ्लूची (Bird Flu) लाट उसळण्याची भीती निर्माण झाले आहे. देशातील सहा राज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झाली असून राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि छत्तीसगडमध्ये पक्षांचे सॅम्पल टेस्टसाठी पाठवण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि केरळ या राज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झाली होती. मध्य प्रदेश आणि केरळमधून अन्य राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी एकूण मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू झाला असून राज्य सरकारने मयूर विहार, द्वारका या भागातील प्रत्येकी चार प्रमाणे सॅम्पल गोळा करुन लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. राजधानी दिल्लीत मयूर विहार फेज 3 परिसरातील पार्कमध्ये आतापर्यंत जवळपास 200  मृत कावळे आढळल्यानंतर बर्ड फ्लूची चाचपणीला वेग आला आहे. ओखला बर्ड सेंक्चुरीमध्ये देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

निरीक्षणासाठी याठिकाणी रॅपिड रिस्पॉन्स टीम देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.  दिल्लीमध्ये मागील चार दिवसांत जवळपास 50 कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले आहे.  त्यामुळे आता कोरोनानंतर बर्ड फ्लूची भीती निर्माण झाली आहे. अद्याप दिल्ली सरकारने राज्यात बर्ड फ्लूची केस सापडल्याची कोणतीही पुष्टी अद्याप केलेली नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : तुमची काही तक्रार आहे का? खरातला न्यायमूर्तींनी विचारलं, कोर्टात सुनावणीवेळी काय घडलं?

युद्धाच्या झळा सोसेनात, पाकिस्ताननं केलं लॉकडाऊन! दुकाने, रस्ते बंद... लग्नसोहळ्यांनाही ब्रेक

निखिल बने पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आणखी एका अभिनेत्याच्या गाडीचा अपघात ! 'हे' ठरलं कारण

Latest Marathi News Live Update : शिंपेगावमध्ये मूकबधिर तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

SCROLL FOR NEXT