CM H. B. Sarma e sakal
देश

'इंदिरा गांधींसारख्या हुकूमशहाला समुद्रात फेकलं, आता...' BJP नेत्याचं विधान

सकाळ डिजिटल टीम

हैदराबाद : जेव्हा एखादा हुकूमशाह मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतो तेव्हा देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी आपल्याला लढत राहावे लागेल. इंदिरा गांधींसारख्या (Indira Gandhi) हुकुमशहाला समुद्रात फेकलं होतं. आता इथं समुद्र तयार आहे आणि कोणाला समुद्रात फेकायचं आहे ते तेलंगणावासियांना माहिती आहे, असं वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते एच. बी. शर्मा यांनी केले.

तेलंगणामधील वारंगल येथे भाजपच्यावतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. आपल्याला अन्यायाविरोधात लढायचं आहे. काहीही झाले तरी अन्यायासोबत तडजोड करायची नाही. आपले कार्यकर्ते आता तयार आहेत. त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. पण, कष्टाचं फळ नेहमी गोड असते. ज्यावेळी ते आपल्यावर हल्ला करतील त्यावेळी नवीन तेलंगणाची निर्मिती होईल. त्यामुळे तुम्हाला सर्वांना लढायचे आहे, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

भारतवासियांनी इंदिरा गांधींसारख्या हुकूमशहाला समुद्रात फेकलं होतं. आता समुद्र तयार आहे आणि त्यात कोणाला फेकायचं आहे? हे तेलंगणातील जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे. भारतात कधीच हुकूमशाही चालली नाही. भारतानं हुकूमशाहीला विरोध केला होता. भविष्यात देखील हुकूमशाही चालणार नाही? अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली.

हुकूमशाह नेमकं कोणाला म्हटलं? -

पंतप्रधान मोदी हुकूमशाह आहेत, अशी टीका विरोधकांकडून नेहमीच केली जाते. पण, मोदी हुकूमशाह नसून ते जनतेच्या हिताचे निर्णय घेतात, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडून इंदिरा गांधींचा हुकूमशाह म्हणून उल्लेख करण्यात आला. पण, आता समुद्रात कोणाला फेकायचं? हे तेलंगणावासियांना चांगलं माहितीये, असंही मुख्यमंत्री म्हणाले. हा टोला त्यांनी नेमका कोणाला लगावला? याबाबत चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, १५ मिनिटांच्या अंतरासाठी ६ तास; दिवसभर वाहतूक कोंडी

Shiroli Assault Case Update : शिरोली अत्याचारप्रकरणाला नवं वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यास रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याचा प्रकार; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

'लग्नाआधी गर्भवती राहिले ते बरं झालं' अभिनेत्री नेहा धुपिया खुलासा करत म्हणाली...'मी देवाचे आभार मानते की...'

Virar Crime: आई नाही म्हणतेय! प्रेयसीचा लग्नाला नकार; प्रियकराने प्रेयसीसह आईची हत्या केली, स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न

IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT