कर्नाटकातील हिजाबचा वाद (Hijab Controversy) तामिळनाडूच्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचला आहे. तामिळनाडू शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत (Tamil Nadu Urban Local Body Election) मतदान करण्यासाठी आलेल्या मुस्लिम महिलेला भाजप बूथ कमिटीच्या (BJP Booth Committee) सदस्याने अडवून गोंधळ घातला. ही महिला हिजाब घालून मतदान करण्यासाठी आली होती. आता भाजपच्या एजंटला अटक करण्यात आली आहे.
भाजपच्या पोलिंग एजंटने मदुराई जिल्ह्यातील मेलूर नगरपालिकेतील एका बूथवर महिलांना तोंड झाकून मतदान करण्यास आक्षेप घेतल्यानंतर तामिळनाडूच्या (Tamil Nadu) शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हिजाबचा मुद्दा शनिवारी पुन्हा चर्चेत आला. हिजाब घातलेल्या महिलेला मतदान करण्यास मज्जाव केल्याप्रकरणी भाजपचा बूथ एजंट गिरिराजनला मदुराई पोलिसांनी अटक केली आहे.
गिरीराजन यांच्यावर आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला (BJP booth agent arrested) आहे. सत्ताधारी DMK आणि प्रमुख विरोधी AIDMK सह इतर सर्व पक्षांचे मतदान अधिकारी आणि पोलिंग एजंट, भाजप एजंट गिरिराजन यांनी घेतलेल्या आक्षेपाशी सहमत नव्हते. त्यानंतर बूथवरील मतदान ३० मिनिटे विस्कळीत झाले. हिजाब (Hijab Controversy) घातलेली महिला बूथच्या आत असताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गिरीराजन यांना मतदान केंद्राबाहेर पाठवण्यात आले आणि भाजपच्या आणखी एका कार्यकर्त्याला पक्षाचा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर गिरीराजनला पोलिसांनी ताब्यात घेतले. तामिळनाडूमधील ६४० हून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १२,५०० पेक्षा जास्त प्रभाग सदस्य निवडण्यासाठी शनिवारी मतदान शांततेत पार पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.