Chaitra Kundapur CCB Police esakal
देश

Chaitra Kundapur : भाजपकडून तिकीट देण्याचं आमिष दाखवून पाच कोटींची फसवणूक; आरोपी चैत्राचा आत्महत्येचा प्रयत्न?

चैत्राची सीसीबी पोलिस (CCB Police) चौकशी करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

जामीन न मिळाल्यास स्वामीजी उच्च न्यायालयात (High Court) जाण्याची शक्यता आहे.

बंगळूर : भाजपकडून तिकीट देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सीसीबीच्या ताब्यात असलेल्या चैत्रा कुंदापूर (Chaitra Kundapur) या चौकशी दरम्यान खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल केले.

चैत्राची सीसीबी पोलिस (CCB Police) चौकशी करत आहेत. काल दुसऱ्या दिवशी चैत्रा आजारपणामुळे कोसळल्याची माहिती मिळाली आहे. फसवणूक प्रकरणात प्रथम क्रमांकाची आरोपी असलेल्या चैत्रा यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.

पाच कोटींच्या फसवणूक प्रकरणातील तिसरा आरोपी हालश्री स्वामी यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. हलश्रीच्या वकिलाने ५७ व्या सीसीएच न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून या जामीन अर्जावर आज (१६ सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.

जामीन न मिळाल्यास स्वामीजी उच्च न्यायालयात (High Court) जाण्याची शक्यता आहे. मात्र, मध्येच सीसीबीने अटक केल्यास ते शक्य होणार नाही. आता या खटल्यात हालश्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. गोविंद पुजारी यांच्याकडून त्यांनी थेट दीड कोटी घेतल्याची स्पष्ट कागदपत्रे असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT