Brijbhushan Singh BJP Marathi News : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. भाजपने शनिवारी १६ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील १९५ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, ओम बिर्ला, स्मृती इराणी या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अनेक रनिंग खासादारांचं तिकिट भाजपने कापलं आहे.
विशेष म्हणजे ज्या मतदारसंघांची देशभर चर्चा आहे तिथे भाजपने उमेदवार घोषित केलेले नाहीत. यामध्ये वरुण गांधींचा पीलीभीत मतदारसंघ, मेनका गांधींचा सुल्तानपूर मतदारसंघ, बृजभूषण शरण सिंह यांचा केसरगंज, स्वामी प्रसाद मौर्य यांची मुलगी संघमित्रा मौर्य यांचा बंदायू आणि जनरल व्हीके सिंह यांचा गाझियाबाद मतदारसंघ; या जागांवर भाजपने सस्पेन्स कायम ठेवला आहे.
वरुण गांधी आणि मेनका गांधी यांना यावेळी भाजप उमेदवारी देणार नसल्याचं बोललं जात आहे. स्वपक्षाविरोधात बंडखोरी वृत्ती दाखवल्यामुळे वरुण गांधी मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. याशिवाय ते पक्षाच्या कार्यक्रमाच्या पोस्ट आणि रिपोस्ट करताना दिसत आहेत.
देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये ५१ जागांवरील उमेदवारांची भाजपने घोषणा केली आहे. यामध्ये चार नवीन चेहरे मैदानात आहेत. यात श्रावस्तीतून साकेत मिश्र, आंबेडकर नगरमधून रितेश पांडे, जौनपूरहून कृपा शंकर सिंह आणि नगीना येथून ओम कुमार यांना उमेदवारी मिळाली आहे.
ज्या झारखंडमुळे मागच्या महिन्यात राजकीय वातावरण गरम झालं होतं. तिथे भाजपने दोघांची तिकिटं कापली आहेत. हजारीबाग येथून मनिष जयस्वाल यांना तिकिट देण्यात आलंय. येथूनच माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे चिरंजीव जयंत सिन्हा खासदार आहेत. लोहरदगा (एसटी) या जागेवरुन तीनवेळा निवडून गेलेले सुदर्शन भगत यांच्याऐवजी पक्षाने समीर उरांव यांना संधी दिली आहे.
विशेष म्हणजे भाजपने तीन माजी मुख्यमंत्र्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. यात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच सर्बानंद सोनोवाल आणि विप्लव कुमार देब यांना डिब्रुगड आणि पश्चिम त्रिपुरामधून संधी देण्यात आलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.