Chitra Wagh on Faggan Singh Kulaste sakal
देश

मोदी सरकारमधील मंत्र्याविरोधात चित्रा वाघ आक्रमक, कारवाईची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या भाजपच्या केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते (Union Minister Faggan Singh Kulaste) यांच्याविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदींना (PM Modi) तत्काळ दखल घेण्याची विनंती केली आहे. तसेच केंद्रीय मंत्र्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी महिला आयोगाला केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक का झाल्या? -

फग्गन सिंह कुलस्ते यांनी रस्त्यांची तुलना खासदार हेमा मालिनी यांच्या गालासोबत केली होती. ते अमरपूर येथील रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देत होते. यावेळी त्यांची जीभ घसरली. ठेकेदारांनी रस्ते हेमा मालिनीच्या गालांसारखे चांगले बनवले. पण, गावात पाणी नाही. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास होत आहे, असं फग्गन सिंह कुलस्ते म्हणाले होते. त्यानंतर महिलांचा अपमान केला असा आरोप करत अनेकांनी कुलस्ते यांच्यावर कारवाईची मागणी केली. पण, मी महिलांचा अपमान होईल असं काहीही बोललो नाही. मी केलेलं वक्तव्य वाईट नाही, असं म्हणत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं कुलस्ते यांनी सांगितलं. त्यामुळेच भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत.

चित्रा वाघ नेमक्या काय म्हणाल्या? -

चित्रा वाघ यांनी ट्विट करत फग्गन सिंह कुलस्ते यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी रस्त्याची केलेली तुलना ही निषेधार्ह आहे. महिलांचा अपमान होणारी भाषा राजकीय नेत्यांकडून वापरलं जाणं अतिशय गंभीर आहे. या घटनेची पंतप्रधान मोदी यांनी दखल घ्यावी. तसेच राष्ट्रीय महिला आयोगानं केंद्रीय मंत्र्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय; 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

Iran Politics: इराणच्या सत्तेत मोठी खळबळ! खामेनेईंविरोधात घरातूनच बंड? नातलगाने मांडला 'नवीन सरकार'चा आराखडा

Marathi News Live Updates : जालन्यात महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू

NEET paper leak: 'नीट'च्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

Nagpur Crime : निर्भयच्या घरात आढळला सुऱ्या, चॉपर, लॅपटॉप अन् गर्भनिरोधकांचा साठा

SCROLL FOR NEXT