Nupur Sharma
Nupur Sharma esakal
देश

भाजपच्या बोलघेवड्या नेत्यांना बसणार लगाम; 38 नेत्यांची यादी तयार

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून देशात धार्मिक वाद उफाळून आलाय.

गेल्या काही दिवसांपासून देशात धार्मिक वाद उफाळून आलाय. हिंदू विरुध्द मुस्लिम अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्यातच आता भाजपच्या काही नेत्यांनी मुस्लिम धर्मांवर टीका करुन रोष ओढवून घेतलाय. मोहंमद पैगंबरांवर (Prophet Muhammad) आक्षेपार्ह टिपणी करणं भाजपच्या (BJP) चांगलंच अंगलट आलंय. जागतिक पातळीवर याचे पडसाद उमटताच धास्तावलेल्या भाजपानं बोलघेवड्या नेत्यांना लगाम घालण्याचा निर्णय घेतलाय.

धार्मिक भावना दुखावणाऱ्या पक्षातील 38 नेत्यांची यादी भाजपनं तयार केलीय. पैगंबरांवरील वादग्रस्त टिपणीप्रकरणी नूपुर शर्मा (Nupur Sharma) व नवीनकुमार जिंदल यांच्यावर कारवाई केल्यानंतर भाजपनं मागील 8 वर्षांत भाजप नेत्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्ये आयटी तज्ञांच्या मदतीनं शोधून काढली. यामध्ये सुमारे 2700 वक्तव्यांतील शब्द हे संवेदनशील आढळले. 38 नेत्यांना धार्मिक भावना दुखावल्याचे दिसून आलं.

यातील 27 नेत्यांना अशी वक्तव्ये करू नयेत. पक्षाच्या परवानगीशिवाय धार्मिक मुद्द्यांवर वक्तव्य करू नये, अशी सक्त ताकीद त्यांना देण्यात आलीय. भाजपच्या 38 नेत्यांची वक्तव्ये ही धार्मिक भावना दुखावणाऱ्या गटात आढळली. या वादग्रस्त नेत्यांत अनंतकुमार हेगडे, गिरिराज सिंह, विनय कटियार, तथागत राय, शोभा वरंदलाजे, प्रताप सिम्हा, महेश शर्मा, टी. राजा सिंह, विक्रमसिंह सैनी, साक्षी महाराज, संगीत सोम आदींच्या वक्तव्यांचा समावेश आहे.

'अल कायदा'ची भारताला थेट धमकी

अल कायदा (Al Qaeda) या दहशतवादी संघटनेनं भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिलीय. अल कायदानं 6 जून रोजी जारी केलेल्या अधिकृत पत्रात गुजरात, यूपी, मुंबई आणि दिल्लीत आत्मघाती हल्ला करण्यास तयार असल्याची धमकी दिलीय. भाजपच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मांनी क्षयरोगाच्या चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद (Mohammad Paigambar) यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल अल कायदानं ही धमकी दिलीय.

14 देशात संताप

भारताविरोधात निदर्शनं करणाऱ्या देशांमध्ये इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया, इंडोनेशिया आणि पाकिस्तान (Pakistan) यांचा समावेश आहे. याशिवाय भारतातील भाजप प्रवक्त्यांविरोधात विरोधी पक्ष सातत्यानं नाराजी व्यक्त करत आहेत. शर्मा यांना अटक करण्याची मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

Fadnavis Interview : ''मी यू टर्न घेतोय, पण शिवसैनिकांना काहीतरी सांगावं लागेल'', शाहांच्या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Jennifer Lopez & Ben Affleck : अवघ्या दोन वर्षात जेनिफर-बेन घेणार घटस्फोट ? मीडिया रिपोर्ट्सने उडवली खळबळ

Aditya Thackeray: लोकसभेनंतर शरद पवार भाजपसोबत जातील का? विश्वासार्हतेबद्दल आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT