Karnataka Assembly Election esakal
देश

Karnataka Election : भाजपला एकाही मुस्लिम मताची गरज नाही; मोदींनी फोन केलेल्या नेत्याचं वादग्रस्त विधान

कर्नाटकातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.

सकाळ डिजिटल टीम

Karnataka Election 2023 : कर्नाटकातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. 10 मे रोजी विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election) होणार आहे, तर 13 मे रोजी निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलंय.

भाजपला एकाही मुसलमान (Muslims) मताची गरज नाही, असं विधान भाजपच्या (BJP) एका नेत्यानं केलंय. कर्नाटकातील शिवमोग्गामध्ये बोलत असताना माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांनी हे विधान केलंय.

विरशैव-लिंगायत समाजाच्या मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी हे म्हटलंय. त्यांच्यासोबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे देखील या सभेत सामील झाले होते. ईश्वरप्पा यांच्या या विधानावर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरूवात केलीये.

एकानं प्रश्न विचारलाय की, भाजपच्या ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेचं काय झालं? तोही एक जुमला होता का? आणखी एका तरुणानं म्हटलंय, पंतप्रधान मोदी यांनी याच माणसाला फोन केला होता आणि त्याचा पाठिंबा मागितला होता. आता त्यानं तेढ निर्माण होईल, अशी विधानं करण्यास सुरुवात केली आहे, हे मोदी यांचं खरं रुप आहे, असं नमूद केलंय. ईश्वरप्पांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी PM मोदींनी त्यांना फोन करुन विजयाची हमी मागितली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT