bjp25 
देश

भाजपचे ‘नवा गडी, नवे राज्य’; मित्रपक्षाची साथ सोडत आसाममध्ये नवी आघाडी

सकाळन्यूजनेटवर्क

कोक्राझार- आसाममधील बोडोलँड प्रादेशिक परिषदेमध्ये (बीटीसी) भाजपने बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) या आपल्या सहकारी पक्षाकडे पाठ फिरवत नव्या सहकाऱ्याच्या साह्याने बहुमताचा आकडा गाठला असून सत्तेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ‘बीपीएफ’ने सत्ता स्थापनेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाकडे भाजपने दुर्लक्ष केले.

नुकत्याच झालेल्या ‘बीटीसी’च्या निवडणुकीत ‘बीपीएफ’ सर्वांत मोठा पक्ष ठरला. त्यांना ४० पैकी १७ जागा मिळाल्या. भाजपला ९ जागांवर विजय मिळाला. युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (युपीपीएल) या पक्षाला १२, काँग्रेसला एक, तर गण सुरक्षा पार्टीला एक जागा मिळाली. राज्यातील सर्वानंद सोनोवाल सरकारमध्ये भाजप आणि ‘बीपीएफ’ हे सहकारी पक्ष असून ‘बीपीएफ’चे तीन आमदारांना मंत्रिपदेही आहेत. राज्यात एकत्र असूनही ‘बीटीसी’ची निवडणूक भाजप आणि ‘बीपीएफ’ने स्वतंत्रपणे लढविली. या निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली होती. निवडणुक निकालानंतर बहुमतासाठी केवळ चार जागा कमी पडत असल्याने ‘बीपीएफ’ने भाजपला मदतीचे आवाहन केले. मात्र, निकालानंतर काही वेळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘यूपीपीएल’ या ‘मित्र’ पक्षाला १२ जागा मिळाल्याबद्दल त्यांचे ट्वीटरवरून अभिनंदन केले आणि राजकीय दिशा स्पष्ट केली. यानंतर लगेचच मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ‘यूपीपीएल’चे प्रमुख प्रमोद बोडो हे ‘बीटीसी’चे नवे मुख्य कार्यकारी सदस्य असतील, असे जाहीरही केले. सत्तेमध्ये गण सुरक्षा पार्टीही सहभागी आहे. लवकरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे.

घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मार्च 2021 पूर्वी घ्या PM आवास योजनेचा लाभ

‘बीटीसी’ ही स्वायत्त जिल्हा परिषद असून त्याअंतर्गत कोक्राझार, चिरांग, बस्का आणि उदलगुरी हे चार जिल्हे येतात. नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या चारही प्रमुख गटांनी केंद्र सरकारबरोबर जानेवारीमध्ये केलेल्या करारानंतर ही निवडणुक झाली आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी ईशान्येतील जनतेची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. ‘बीटीसी’च्या निवडणुकीत यश मिळविल्याबद्दल मी आमचा सहकारी पक्ष यूपीपीएलचे अभिनंदन करतो. ते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील, अशी मी इच्छा व्यक्त करतो. आमच्यावर विश्‍वास ठेवल्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT