Modi1 
देश

PM Modi : "भाजपच्या प्रयत्नांमुळं भारतात गरीबी कमी होतेय"; PM मोदींनी दिला तज्ज्ञांचा हवाला

गुजरातमधील विजयासाठी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भाजपनं गेल्या आठ वर्षात देशात अनेक बदल घडवून आणले असून देशातील गरीबीही कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या हवाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (BJP efforts are reducing poverty in India PM Modi cited experts)

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज हाती आला. यात हिमाचलमध्ये पराभव झाला असला तरी गुजरातमध्ये भाजपनं रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. यापार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी मोदी म्हणाले, कोणत्या समुदयाकडं किती मत आहेत यावर आम्ही राजकारण आणि देशही चालवत नाही. आमच्या या बदलत्या राजकारणाकडं तज्ज्ञही पाहत आहेत. भारतात गरीबी कमी होत आहे. देशात गेल्या आठ वर्षात गरीबांना सुविधा देण्याबरोबर आधुनिक पायाभूत सुविधाही पुरवल्या आहेत.

शॉर्टकटचं राजकारणाला भारतीय मतदारांना नकोय

आमच्या प्रत्येक घोषणेमागे एक दूरगामी विचार असतो. देशाला आज शॉर्टकट नकोय, देशाचा प्रत्येक मतदाराला माहिती आहे की, आपल्यासाठी काय गरजेचं आहे. शॉर्टकटच्या राजकारणाचा किती मोठा परिणाम त्यांना भोगावे लागेल हे त्यांना माहिती आहे.

गाव-शहर, गरीब-श्रीमंत सर्वांची पहिली आवड भाजप

भारत प्रथम या भावनेनं आपल्याला पुढे जायचं आहे. आज देशात गाव किंवा शहर, गरीब किंवा श्रीमंत सर्वांची पहिली आवड भाजप आहे. भाजपला गुजरातच्या आदिवासींचाही मोठा आशीर्वाद मिळाला आहे. गुजरातमध्ये ४० आरक्षित जागांपैकी २४ जागा भाजपनं जिंकल्या आहेत. आज आदिवासी भाजपला आपला आवाज मानत आहेत. भाजपला मोठा प्रतिसाद मिळतोय. हा बदल संपूर्ण देशाला जाणवतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT