Amrita Roy Mahua Moitra 
देश

Lok Sabha 2024: महुआ मोईत्रांना हरवणार 'राजमाता'? भाजपकडून तिकीट मिळालेल्या नेत्या कोण आहेत?

Amrita Roy rajmata of Krishnanagar :तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि विद्यमान खासदार महुआ मोईत्रा यांना टक्कर देण्यासाठी भाजपने ट्रम्प कार्ड खेळल्याचं बोललं जात आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- भाजपने रविवारी उमेदवारांची आपली पाचवी यादी जाहीर केली. यात १११ उमेदवारांची नावे आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि विद्यमान खासदार महुआ मोईत्रा यांना टक्कर देण्यासाठी भाजपने ट्रम्प कार्ड खेळल्याचं बोललं जात आहे. कारण, भाजपने मोईत्रांविरोधात कृष्णनगर मतदारसंघातून राजमाता अमृता रॉय यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

अमृता रॉय या कृष्णनगरातील 'राजबारी' ( royal palace) च्या राजमाता आहेत. रॉय यांनी एक आठवड्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना मोईत्रांविरोधात उभे केले जाण्याची शक्यता होती. याबाबत त्यांच्याशी अनेकदा चर्चा करण्यात आली. अखेर अमृता रॉय निवडणूक लढण्यासाठी तयार झाल्या. कृष्णनगरला मोठा सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा लाभला आहे. (BJP fielding Amrita Roy rajmata of Krishnanagar Royal Palace in Bengal against tmc Mahua Moitra)

राजकीय वारसा

अमृता रॉय या १८ व्या शतकातील महाराजा क्रिष्णा चंद्रा रॉय यांच्याशी थेट संपर्क सांगतात. भारतीय इतिहासात क्रिष्णा चंद्रा रॉय हे प्रभावी व्यक्तीमत्व राहिले आहेत. ते आपल्या चांगल्या राजकारभारासाठी ओळखले जातात. १८ व्या शतकात त्यांनी अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या, कलेला चालना दिली. आपल्या ५५ वर्षांच्या राजवटीत त्यांनी बंगाली संस्कृतीला उंचीवर नेले.

नादिया राजघराण्याचे असलेले क्रिष्णा चंद्रा हे वयाच्या अठराव्या वर्षी राजगादीवर बसले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय सुधारणांना चालना दिली. त्याचा परिणाम त्यांच्या राज्यावर तर पडलाच पण याचा प्रभाव येणाऱ्या काळातील राजांवर टिकून राहिला. कृष्णनगर राजबारी (Palace of Krishnanagar) हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अद्वितीय आहे. नादिया जिल्ह्यातील हा महत्त्वाचा सांस्कृतिक वारसा आहे.

कृष्णनगर हे नादिया राजांचे निवासस्थान राहिले आहे. नादिया जिल्ह्यात असलेला रॉयल पॅलेस आजही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पॅलेसमध्ये आजही अनेक दुर्मिळ वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. नादिया राजांची भव्यता या रॉयल पॅलेसकडे पाहून होते. याच राजघराण्याशी संबंध सांगणाऱ्या अमृता रॉय यांना तिकीट मिळाल्याने भाजपला नक्कीच फायदा होणार आहे. रॉय या कृष्णनगरमधील परिचित आणि स्थानिक चेहरा आहेत. त्यामुळे महुआ मोईत्रा आणि अमृता रॉय यांच्यामध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT