Loksabha Election 2024 
देश

Loksabha Election 2024: राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजप जाहीर करणार लोकसभेसाठी पहिली यादी...

निवडणुका जाहीर होण्याआधी भाजपची पहिली यादी येणार आहे. दिल्लीत भाजपची बैठक सुरु आहे.

Sandip Kapde

Loksabha Election 2024: २२ जानेवारीला अयोध्या येथील मंदिरात श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाजप लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर करणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

निवडणुका जाहीर होण्याआधी भाजपची पहिली यादी येणार आहे. दिल्लीत भाजपची बैठक सुरु आहे. भाजपचे सर्व राज्यांचे प्रमुख अध्यक्ष विविध  आघाड्यांचे अध्यक्ष दिल्लीत पोहोचले आहेत. या बैठकीत चर्चेनंतर कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय होणार आहे, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला नारा देखील तयार केला आहे. पक्षाने पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी 'सपने नहीं हकीतत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं' असा नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आज (शुक्रवार २२ डिसेंबर) दिल्लीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक सुरू होत असताना भाजपने हा नारा निवडला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.

भाजपची पहिली यादी कधी येणार?

या बैठकीत विकास भारत संकल्प अभियानासोबतच छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही चर्चा होऊ शकते. किंबहुना, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला आहे. तर तेलंगणात काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे सेमीफायनल म्हणून पाहिले जात होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT