Narendra Modi and sonia Gandhi Narendra Modi and sonia Gandhi
देश

काँग्रेसच्या पाचपट कॉर्पोरेट देणग्या भाजपला; एका वर्षांत 720 कोटींहून अधिक रक्कम

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये कॉर्पोरेट कंपन्यांकडून राष्ट्रीय राजकीय पक्षांना 921.95 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. यामधील सर्वाधिक देणगी भारतीय जनता पक्षाला मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे. असोशिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स (ADR) च्या एका रिपोर्टनुसार भाजपला या आर्थिक वर्षामध्ये एकूण 720.407 कोटी रुपये कॉर्पोरेट देणगी मिळाली आहे. या रिपोर्टमध्ये पाच पक्षांना मिळालेल्या देणगीचं विश्लेषण केलं गेलंय. (corporate donations to political party news)

ADR ही राजकारणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काम करणारी खासगी संघटना असून एका विश्लेषणानुसार 2017-18 आणि 1018-19 दरम्यान राष्ट्रीय राजकीय पक्षांना मिळणाऱ्या कोर्पोरेट देणगीमध्ये 109 टक्क्यांची वाढ झाली आहे. हे विश्लेषण पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या देणग्यांच्या माहितीवरुन करण्यात आलं आहे. एका आर्थिक वर्षात ₹ 20,000 पेक्षा जास्त देणग्या देणाऱ्या देणगीदारांच्या पक्षांनी भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या तपशिलांच्या आधारे हे विश्लेषण करण्यात आलंय.

ज्या पाच राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचं विश्लेषण ADR ने केलंय त्यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया - मार्क्सवादी हे पक्ष सामील आहेत. रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2019-20 च्या दरम्यान, काँग्रेस पक्षाला 154 देणगीदारांकडून 133.04 कोटी रुपये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 36 कॉर्पोरेट देणगीदारांकडून 57.086 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. तर सीपीएमने 2019-20 साठी कॉर्पोरेट देणग्यांमधून कोणतेही उत्पन्न मिळालं नसल्याचं म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT