Gujarat Assembly Election JP Nadda esakal
देश

Gujarat Election : सत्ता येताच भाजप देणार 20 लाख नोकऱ्या, 10 लाखांचा आरोग्य विमा; जाहीरनामा प्रसिद्ध

भाजपनं मतदारांना डोळ्यासमोर ठेवून 20 लाख तरुणांना रोजगार देण्याचं जाहीर केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

भाजपनं मतदारांना डोळ्यासमोर ठेवून 20 लाख तरुणांना रोजगार देण्याचं जाहीर केलं आहे.

भारतीय जनता पक्षानं (BJP) गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Assembly Election) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपनं मतदारांना डोळ्यासमोर ठेवून 20 लाख तरुणांना रोजगार, 2 एम्स स्तरावरील संस्थांची स्थापना आणि 10 लाखांचा आरोग्य विमा यासह अनेक मोठी आश्वासनं दिली आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी आज (शनिवार) गांधीनगर येथील प्रदेश कार्यालयात हे ठराव पत्र जारी केलं. जेपी नड्डा म्हणाले, 'गुजरात ही संतांची भूमी आहे. भाजप सरकार जे सांगतं तेच करतं. आम्ही संविधानाचं (Constitution) पालन करत असतो. आमच्या या संकल्प पत्रानं गुजरातचा नक्की विकास होईल.'

मोदीजी म्हणतात, संविधान हा आपला सर्वात मोठा धर्म आहे, त्याचं पालन करणं आणि ते सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सुजलाम सुफलाम योजनेंतर्गत 'सिंचन योजना' पुढं नेण्यासाठी आम्ही 25 हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यासह आम्ही दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये 2 सी फूड पार्क उभारणार आहोत, असंही नड्डांनी जाहीर केलं.

भाजपच्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासनं

भाजपच्या संकल्प पत्रानुसार, आयुष्मान भारत योजनेंतर्गत 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आता 10 लाख करण्यात येणार आहे. पुढील 5 वर्षात गुजरातमधील तरुणांना 20 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसंच 10,000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये 20,000 सरकारी शाळांचं रूपांतर उत्कृष्ट शाळांमध्ये केलं जाईल. 3 सिव्हिल मेडिसिटी, 2 AIIMS स्तरावरील संस्था, विद्यमान रुग्णालये, CHC आणि PHC च्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा महाराजा श्री भागवत सिंह स्वास्थ्य कोष तयार केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : अभिजीत दिपकेंच्या आजीचे अंत्यसंस्कार थांबवले; आईंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT