Ramdas Athavale  
देश

ब्राह्मणांचा पक्ष या इमेजमधून बाहेर येत भाजपनं सर्वांना आकर्षित केलंय - आठवले

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या आपल्या मैत्रीवरही आठवलेंनी भाष्य केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भाजप हा ब्राम्हणांचा पक्ष होता असं म्हणतात पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकासाचा नारा देत सर्वांना आकर्षित केलं आहे, असा दावा केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइं) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे. रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडसाठी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (BJP has attracted everyone by coming out of this image of Brahmins party says Ramdas Athawale)

आठवले म्हणाले, भाजप हा आधी ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणामुळं सर्वधर्मीय लोकांना या पक्षानं आकर्षित केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपचं विविध मुद्द्यांवरुन कौतुक केलं. पंतप्रधान मोदींसबोत ज्यावेळी भेट होते तेव्हा आमच्यामध्ये गप्पा होतात. महाराष्ट्राचं कसं चाललंय असं ते मला विचारतात. यावर महाराष्ट्रात आपल्यासारखं चांगलं चाललेलं नाहीये, असं मी त्यांनी सांगतो, असंही आठवले म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या मैत्रीबाबत बोलताना आठवले म्हणाले, "मी आंबेडकरवादी असल्यानं पवारांसारखे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील माझे मित्र आहेत. शरद पवारांनी मला मंत्री होण्याची संधी दिली. मला मंत्रीपद जमेल का नाही अशी चर्चा होती. मी व्हाईट कपडे घेतले होते राजभवनावर जायला निघालो आणि ट्रॅफिक होते म्हणून मी पळत राजभवनावर गेलो, अशी आठवणंही त्यांनी यावेळी सांगितली. पण मला इच्छितस्थळी पोहोचायचं असलं की पोहोचतोच तसेच इतरांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवायचं असलं की त्यांना पोहोचवतोही असंही त्यांनी म्हटलं आहे.

पवारांशी अधून मधून होतो फोन

शरद पवार यांच्याशी अधूनमधून आपला फोन होतो हे सांगायलाही ते विसरले नाहीत. आठवले म्हणाले, शरद पवार मला सांगतात की माझ्या जॅकेटची बटणं कशी आहेत. यावर मी पवारांना सांगतो "माझ्या शर्टाची चांगली आहेत बटण, कारण मी खातो मटण" अशा आपल्या खास शैलीत त्यांनी पवारांसोबच्या मैत्रीवर भाष्य केलं.

गोवंश हत्याबंदीला होता विरोध

आठवले म्हणाले, गोवंश हत्या बंदीला आमचा विरोध होता. काही मुद्द्यांवर विरोध असला तरी जास्त मुद्द्यांवर या कायद्यासोबत आमचं एकमत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT