Karnataka Election Esakal
देश

Karnataka Election: भाजप सत्तास्थापनेसाठी किंगमेकरच्या संपर्कात! कुमारस्वामी मुख्यमंत्री ठरवणार?

काँग्रेससह भाजपच्या गोटात हालचालींना वेग

अंकिता खाणे (Ankita Khane)

कर्नाटकात काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेस कंबर कसत आहे. सध्या मतमोजीणी सुरु असून हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे.

घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावंल आहे. नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पण कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल पक्षासह देशभरात उपस्थित होत आहे. मुख्यमंत्रीपदासाठी संकटमोचक ठरलेले डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या चुरस पाहायला मिळत आहे. सिद्धरामय्या हे माजी मुख्यमंत्री आहेत.

निवडून आलेल्या नेत्यांना आमदारांना एकत्र करण्याची तयारी सुरू झाली आहे. तशाच हालचाली भाजपकडून सुरू झाल्या आहेत. किंगमेकर असणाऱ्या जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी भाजपच्या केंद्रीय नेत्यानी चर्चा आणि बैठका सुरू केल्या आहेत. तर काँग्रेसचेही काही नेते जेडीएसच्या संपर्कात आहेत. बहुमताचा आकडा सातत्याने बदलत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसकडून मोठ्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार जेडीएसच्या संपर्कात भाजपचे केंद्रीय नेतृत्व आहेत. पुढचा अर्धा तास कर्नाटकसाथी महत्वाचा आहे. भाजप तसेच काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू आहेत. याठिकाणी फोडाफोडीचं राजकारण होण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे.

कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. तर जेडीएस पक्ष या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका निभावण्याची शक्यता आहे. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे. भाजप ही सत्ता राखण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर भाजपचे दक्षिण भारतातील वर्चस्व कमी होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील या एकमेव राज्यात भाजपला सत्ता टिकवून ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या संपूर्ण प्रक्रियेत जेडीएस किंगमेकर ठरणार असल्याचं दिसून येत आहे.

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान पार पडलं होतं. राज्यात मतदानासाठी 58,545 मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. या निवडणुकीत उभ्या असलेल्या 2,615 उमेदवारांचा फैसला 5.31 कोटी मतदार करणार आहेत. राज्यात 73.19 टक्के मतदान झालं. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात विधानसभेच्या 224 जागा आहेत. तसेच बहुमतासाठी 113 चा आकडा आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT