subramanian swamy 
देश

भाजपचा आयटी सेल बदमाश; स्वामींनी दिला घरचा आहेर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भाजपच्या आयटी सेलवरून सोशल मीडियावर अक्षरशः घाण पसरवली जात असून अमित मालवीय यांच्या अध्यक्षतेखालील हा सारा विभाग बदमाश तसेच धूर्त बनल्याची टीका भाजपचेच खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी केली आहे. स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘मालवीय यांना त्वरित पदावरून हटवा,’ अशी मागणी केली आहे. 

‘आम्ही मर्यादा पुरूषोत्तमाचा पक्ष आहोत ना ? की रावण व दुःशासनाचा ? मात्र ‘एक मालवीय व्यक्तिमत्व’ सोशल मीडियावर सतत घाण व घाणच पसरवत आहे,’ असा जोरदार प्रहार करताना स्वामी यांनी भाजपच्या आयटी सेलचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनाच निशाण्यावर घेतले आहे. मात्र मालवीय यांनी स्वामी यांना सायंकाळपर्यंत थेट प्रत्युत्तर दिलेले नाही.

भाजपचा आयटी सेल गेल्या सहा वर्षांपासून प्रचंड सक्रिय आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सलग दोन वेळच्या लोकसभा विजयांमध्ये मालवीय यांच्या नेतृत्वाखालील आयटी विभागाची भूमिका कळीची राहिल्याचे अनेक भाजप नेते मान्य करतात. मोदी व अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्यांवर सोशल मीडियावरील ‘भक्तगण’ अतिशय खालच्या भाषेत टीका करतात अशा अनेक तक्रारी आल्या व येतही आहेत. 

भाजपच्याच आयटी सेलमधील लोक नावे बदलून आपल्यावर खालच्या पातळीवर टीका करत आहे. आपण आतापावेतो याकडे दुर्लक्ष केले. पण आपले दुखावलेले समर्थक जर प्रतिहल्ले करू लागतील तर त्याची जबाबदारी माझी नसेल. भाजपचा आयटी विभाग बदमाश बनला आहे; पण एक मालवीय व्यक्तिमत्व ही घाण पसरवत आहे. 
- सुब्रमण्यन स्वामी, भाजप खासदार

खुद्द शहा यांनी भाजपाध्यक्ष असताना ‘सोशल मीडिया योद्धे’ अशा शब्दांत आयटी सेलचा गौरव केला होता. आता मात्र या आयटी विभागाचा काच व जाच खुद्द भाजपच्याच नेत्यांना असह्य होऊ लागल्याचे स्वामी यांच्या रूद्रावतारावरून दिसत असल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे. 

स्वामी यांनी अलीकडे घसरता सकल विकास दर व कंबरडे मोडलेली अर्थव्यवस्था याबाबत काही ट्‌विट केली आणि नंतर ते भाजप समर्थक ‘राष्ट्रवादी’ ट्रोल्सच्या थेट निशाण्यावर आले. त्यांच्यावर व्यक्तिगत चिखलफेक झाल्याने प्रचंड दुखावलेले स्वामी यांनी थेट पंतप्रधानांकडे तक्रार केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT