up
up 
देश

VIDEO: MLC निवडणुकीतील पराभवाने भाजप नेत्यांचा राग अनावर; पोलिसांना केली मारहाण

सकाळन्यूजनेटवर्क

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या झांशी जिल्ह्यातील एमएलसी निवडणुकीच्या मतगणेदरम्यान भाजपच्या काही नेत्यांनी जिल्ह्याच्या एसपी सिटीला मारहाण केली आहे. सांगितलं जातंय की, एमएलसी निवडणुकीमध्ये मतगणनेवेळी सपाच्या उमेदवाराचा विजय होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर भाजपचे काही नेते मतगणनेच्या ठिकाणी जाऊन पोहोचले. यावेळी या नेत्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झडप झाली. ज्यात भाजप नेता प्रदीप सरावगी यांनी घटनेस्थळी असणाऱ्या एसपी सिटी विवेक त्रिपाठी यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करत पाडले.

नवभारत टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार समाजवादी पार्टीच्या उमेदवाराने निवडणुकीत आघाडी घेतली होती. त्यानंतर भाजपचे स्थानिक आमदार आणि कार्यकर्ते  मतगणनेच्या स्थळी पोहोचले. यादरम्यान गेटवर उपस्थित असलेले एसपी सिटी विवेक त्रिपाठी आणि त्यांच्या टीमने भाजप नेत्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही. पोलिसांनी रोखल्यानंतर भाजप नेत्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांनी हलक्या बलाचा वापर करत नेत्यांना काऊंटिंग सेंटरपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. 

भाजप नेते यामुळे भडकले आणि स्थानिक नेता प्रदीप सरावगी यांनी एसपी सिटी विवेक त्रिपाठी यांच्यासोबत मारहाण सुरु केली. यावेळी भाजप आमदार आणि कार्यकर्ते त्याठिकाणीच उभे होते. भाजप नेत्याने एसपी सिटीला जब्बर मारहाण करुन त्यांना खाली पाडले. मोठ्या प्रमाणात फोर्स घटनास्थळी आल्यानंतर स्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी मारझोड करणाऱ्या नेत्यांचा पोलिस शोध घेत आहेत. याशिवाय घटनास्थळी मोठ्या प्रमाणात फोर्स तैनात करण्यात आली आहे. 

या घटनेनंतर विरोधी पक्षनेत्यांनी भाजप सरकारच्या कायदा व्यवस्था आणि पक्षाच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. समाजवादी पार्टीचे प्रवक्ता उदयवीर सिंह यांनी म्हटलं की, एमएलसी निवडणुकीत भाजप उमेदवाराला जिंकून देता येत नसल्याच्या रागातून पोलिसांना मारहाण झाली आहे. हे लोक बेशरम आहेत आणि यांना कसलीही लाज नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT