bjp leader claims saffron flag may become national flag some time in future  
देश

'भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनू शकतो..'; भाजप नेत्याचा दावा

सकाळ डिजिटल टीम

हिजाब प्रकरणावरुन (Karnataka Hijab Row) कर्नाटकमध्ये वातावरण तापलेले आहे, या घटनेचे पडसाद देशभरात पाहायला मिळत आहेत. या दरम्यान, भाजप(BJP) चे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) यांनी, भविष्यात 'भगवा ध्वज' हा (Saffron Flag) कधीतरी राष्ट्रध्वज बनू शकतो, असा दावा केला.

मंत्री के एस ईश्वरप्पा म्हणाले की, शेकडो वर्षांपूर्वी श्री रामचंद्र आणि मारुतीच्या रथांवर भगवे झेंडे होते. तेव्हा आपल्या देशात तिरंगा ध्वज होता का? आता तो (तिरंगा) आपला राष्ट्रध्वज म्हणून निश्चित झाला आहे, त्याचा मान राखला गेला पाहिजे, यात प्रश्नच नाही.

लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवता येईल का, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "आज नाही तर भविष्यात कधीतरी. आज देशात 'हिंदू विचार' आणि 'हिंदुत्व'ची चर्चा होत आहे. एक वेळ होती जेव्हा अयोध्येत राममंदिर बांधणार असे आपण म्हणत होतो तेव्हा लोक हसायचे , आता आपण ते बांधत आहोत ना? असेच भविष्यात कधीतरी 100 किंवा 200 किंवा 500 वर्षांनी भगवा ध्वज राष्ट्रध्वज (national flag) होईल. ते पुढे म्हणाले की, तिरंग्याला आता घटनात्मकदृष्ट्या राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली आहे, त्याचा आदर केला पाहिजे आणि जो त्याचा आदर करणार नाही ते देशद्रोही ठरतील.

ते पुढे म्हणाले की, 'भगवा ध्वज फडकवणारे आपणच आहोत, आज नाही तर भविष्यात कधीतरी या देशात हिंदू धर्म येईल, त्यावेळी लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवू, कारण सध्या तिरंगा आपला राष्ट्र आहे. ध्वज आणि आम्ही सर्व त्याचा आदर करतो.' शिवमोग्गा येथील शासकीय फस्ट ग्रेड महाविद्यालयात मंगळवारी हिजाबविरोधी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी तिरंग्याऐवजी भगवा ध्वज फडकवल्याच्या राज्य काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या दाव्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला ईश्वरप्पा उत्तर देत होते.

शिवकुमार यांचे दावे खोटे असल्याचे सांगत त्यांनी हा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, 'डीके शिवकुमार खोटारडे आहेत. हो, तेथे भगवा ध्वज फडकावला गेला, पण राष्ट्रध्वज खाली उतरवला गेला नाही. भगवा ध्वज कुठेही फडकवता येईल, पण राष्ट्र ध्वज खाली करून तसे झाले नाही, कधी झाले नाही आणि कधी होणार नाही. राष्ट्रध्वज हटवला गेला नाही, फक्त ध्वज वापरला गेला.' असे ते यावेळी म्हणाले.

शिवमोग्गा कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिस अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले आहे की, भगवा ध्वज फडकवण्यासाठी राष्ट्रध्वज खाली केला गेला नाही. त्यांनी सांगितले की, खांब रिकामा होता आणि त्यावर काही लोकांनी भगवा ध्वज लावला, नंतर त्यांनी तो देखील काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT