C. T. Ravi Siddaramaiah
C. T. Ravi Siddaramaiah esakal
देश

Political News : 'त्यांनी' मोठं षडयंत्र रचून परमेश्वराचाच पराभव केला; भाजपचा माजी मुख्यमंत्र्यांवर पलटवार

सकाळ डिजिटल टीम

'हिंदुत्व आणि हिंदू धर्म भिन्न आहे. मला नेहमीच भाजपनं हिंदुत्वविरोधी दाखवलं. मी हिंदुत्वविरोधी नाहीये.'

भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी (C. T. Ravi) यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर हिंदूत्वावरुन जोरदार प्रहार केलाय. सनातन धर्म (Sanatana Dharma) आणि हिंदुत्व वेगळं नाहीये. हिंदू धर्म समानतेवर विश्वास ठेवतो, असं रवींनी म्हटलंय.

सी. टी. रवी यांनी ठामपणे सांगितलं की, सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे हिंदुत्वाशी सहमत नसतील, तर याचा अर्थ त्यांना समानता नकोये. सिद्धरामय्यांना जातीवाद हवा आहे, म्हणून त्यांनी षडयंत्र रचून परमेश्वराचा पराभव केला. ते हिंदुत्वाशी सहमत नाहीत, हे त्यांचं चरित्र दाखवतं, असंही ते म्हणाले.

'मला नेहमीच हिंदूविरोधी दाखवण्यात आलं'

सिद्धरामय्यांनी स्पष्ट केलं की, ते हिंदू धर्माचं पालन करणारे आणि हिंदुत्वाच्या विरोधात उभे राहणारे हिंदू आहेत. हिंदुत्व आणि हिंदू धर्म भिन्न आहे. मला नेहमीच भाजपनं हिंदुत्वविरोधी दाखवलं. मी हिंदुत्वविरोधी नाहीये. मी सुद्धा एक हिंदू आहे, पण मी मनुवाद आणि हिंदुत्वविरोधी आहे, असं त्यांनी सांगितलं.

कोणताही धर्म खून किंवा हिंसेला प्रोत्साहन देतो का?

एका मेळाव्याला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं की, कोणताही धर्म खून किंवा हिंसेला प्रोत्साहन देतो का? पण मनुवाद आणि हिंदुत्व हत्या, हिंसा आणि भेदभावाला प्रोत्साहन देतं. हिंदू आणि हिंदुत्वात हाच फरक आहे, असं त्यांनी नमूद केलं. सिद्धरामय्यांनी हिंदुत्वावर केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वी, 8 जानेवारीलाही त्यांनी आपण हिंदू आहोत, पण हिंदुत्वाला विरोध करतो, असं ठामपणे सांगितलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT