Devendra Fadanvis 
देश

Devendra Fadanvis: मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून अन् दोन साथीदारांना घेऊन- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis Mumbai Interview: एका कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवारवादावर भाष्य केलं आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- एका कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवारवादावर भाष्य केलं आहे. शरद पवार यांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष केलं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. म्हणूनच अजित पवार बाहेर पडले. राज्याचं राजकारण सुरुवातीला ३० कुटुंबाभोवती फिरत होतं, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

मी पुन्हा येईन हे केवळ एक वाक्य नव्हतं. मी कशासाठी येईन, हे देखील मी सांगितलं होतं. पण, लोकांनी ते एकच वाक्य प्रसिद्ध केलं. मी पुन्हा येईल असं म्हणालो होतो. त्यानुसार मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो आहेच, पण, त्याचबरोबर दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना घेऊन आलोय, असं फडणवीस म्हणाले. (bjp leader devendra fadanvis criticize congress and sharad pawar in mumbai interview)

काँग्रेस नसती तर भारताचं विभाजन झालं नसतं. काँग्रेस नसती तर देशात भ्रष्टाचार झाला नसता. राजकीय नेत्यांचे मुलं-मुली राजकारणात येऊ नये असं माझं म्हणणं नाही. पण, त्यांनी स्वत: च्या हिंमतीवर यावं. हक्क म्हणून येऊ नये. नेहरुंच्या घरातील व्यक्तीच काँग्रेसचं नेतृत्व करेल असं ठरलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचं कारण तेच आहे. शरद पवारांनी अजित पवारांना तयार केलं, पण ऐनवेळी आपल्या मुलीच्या हातात पक्ष दिला, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे पक्षाचे सर्व सूत्र आदित्य ठाकरेंना देण्याची तयारी करत होते. यासाठी विचारधारा सोडायला देखील तयार होते. त्यामुळे शिवसेना फुटली. परिवारवादाची ऑर्डर तोडण्याचं काम पंतप्रधान मोदी करत आहेत. केवळ कुणाचा मुलगा किंवा मुलगी असल्याने राजकारणात स्थान मिळणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

मुंबईवर हल्ला देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला

मुंबईत झालेला हल्ला एकट्या मुंबईवर हल्ला नव्हता, तर देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला होता. आर्थिक केंद्रावर हल्ला केला गेला होता. भारत काहीच नाही हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. भारताने काय केलं तर अमेरिकेकडे धाव घेतली. पण, अमेरिकेने काहीच मदत केली नाही. एक कमकूवत सरकार आपल्याला पाहायला मिळाले, असं फडणवीस म्हणाले.

आज पाकिस्तान सोडा चीन देखील आपल्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात सरकार अधिक बलशाली झाला आहे. आपण सर्जिकल स्ट्राईक केला. जशासतसं उत्तर देण्यात आलं. भारत आता पूर्वीसारखा कमजोर देश राहिला नाही हे सर्व जगाला कळालं, असं फडणवीस म्हणाले. (Marathi Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT