BJP leader Former Karnataka CM Jagadish Shettar tenders his resignation as an MLA Karnataka Election News  
देश

Karnataka Election News : माजी मुख्यमंत्र्यांनी तिकीट न मिळाल्याने भाजप सोडली, आता आमदारकीही…

रोहित कणसे

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एक दिवसापूर्वीच त्यांनी तिकीट न मिळाल्याने भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली असुन पक्ष आणि आमदार पदाचा राजीनाम देऊन पक्षाच्या हितापेक्षा त्यांनी स्वतःला निवडल्याचं म्हटले आहे.

भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सिरसी येथे कर्नाटक विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, जगदीश शेट्टर आज राजीनामा देणार आहेत हे दुर्दैवी आहे. ते माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्षही राहिले आहेत. पक्षावर फारसा प्रभाव पडणार नाही आणि भाजपला त्यातून सावरण्यासाठी सक्षम आहे. पक्षाने तरूण पिढीला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या शेट्टर यांनी शनिवारी राजीनामा देणार असल्याच्या घोषणेनंतर जगदीश शेट्टर यांनीही आपल्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याने त्यांना तिकीट देण्यात आले नसल्याचे सांगितले. माझ्याविरोधात कट रचला जात आहे, मी राजीनामा दिल्यानंतर सर्व काही सांगेन, असे शेट्टर यांनी एएनआयला सांगितले होते. मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहे. मला निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची की कोणत्याही पक्षासोबत लढायची पुढील कृती मी नंतर ठरवेन असे त्यांनी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : जरा 'बडबड' कमी कर... वीरेंद्र सेहवागचा KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाला, बच्चन, तेंडुलकर यांच्याकडून शिक

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

SCROLL FOR NEXT