Madhuri Jaiswal  ANI
देश

कोविड लसीकरण केंद्रावर भाजप नेत्याचे बर्थडे सेलिब्रेशन; अन्...

भाजपच्या महिला नेत्याच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी लसीकरण केंद्रावर शेकडोच्या संख्येने गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्ते कोरोना काळातील निर्बंध विसरुन एकत्रित जमले होते.

सुशांत जाधव

देशातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यात कोरोनाचे रुग्णाचा आकडा वाढत असताना सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसवून काही नेते मंडळी गर्दीत भर घालत असल्याच्या काही घटना समोर येत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी उभारलेल्या लसीकरण केंद्रावरच (COVID vaccination ) भाजपच्या एका महिला नेत्याचा बर्थडे साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशमधील इंदुर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. या परिस्थितीत इंदुरमधील सदर बाजार परिसरात असलेल्या कोविड लसीकरण केंद्रावर भाजपच्या महिला नेत्याचा बर्थडे साजरा झाल्याचे समोर आले आहे.

भाजपच्या महिला नेत्याच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी लसीकरण केंद्रावर शेकडोच्या संख्येने गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्ते कोरोना काळातील निर्बंध विसरुन एकत्रित जमले होते. मुख्यमंत्री शिवराजसिह यांचा फोटो मागे ठेवून बर्थडे साजरा करण्यात आला. भाजपच्या महिला नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लसीकरण थांबवण्याचा प्रकार घडला. लसीकरणासाठी आलेले लोक रांगेत पुन्हा लसीकरण सुरु होण्याची वाट पाहताना दिसले.

भाजपा नेता आणि वार्ड अध्यक्ष माधुरी जायस्वाल यांनी या सर्व प्रकरणाची आता माफी मागितली आहे. कार्यकर्त्यांनी आनंदाच्या भरात बर्थडे साजरा केला. या सर्व प्रकाराबद्दल मी वार्डातील सर्व नागरिकांची माफी मागते, असे त्या एएनआयशी बोलताना म्हणाल्या आहेत. माधुरी जयस्वाल यांचा बर्थडे साजरा करताना कार्यकर्त्यांनी हॅप्पी बर्थ डे गाणे लावले होते. याचा व्हिडिओही करण्यात आला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर आता माधुरी जयस्वाल यांनी माफी मागितली आहे.

मध्यप्रदेशच्या कॅबिनेट मंत्री असलेल्या उषा ठाकूर यांच्या विधानसभा मतदार संघातील लसीकरण केंद्रावर हा सर्व प्रकार घडला. उषा ठाकुर यांनीच माधुरी जयस्वाल यांची वार्ड अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. जवळपास 8 वर्षांपासून त्या या वार्डातील अध्यक्ष आहेत. गर्दी जमल्यास सामन्यांवर कारवाई केली जाते आता लसीकरण थांबवून लसीकरण केंद्रावर बर्थडे साजरे करणाऱ्यांवर काय कारवाई होणार? असा प्रश्नही उपस्थितीत करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT