Amit Shah Love Story  sakal
देश

Amit Shah Love Story : कोल्हापूरच्या पोरीच्या प्रेमात पडले होते अमित शाह; लग्नासाठी विचारलं तर...

येत्या १९ तारखेला अमित शाह त्यांच्या पत्नीच्या शाळेला भेट देणार आहे.

निकिता जंगले

Amit Shah Love Story : भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांचे देशाच्या राजकारणात महत्त्वाचे योगदान आहे. राजकीय क्षेत्रात ते नावाजलेले नेते म्हणून ओळखले जातात. मोदींच्या अत्यंत निकटवर्तीय असणारे अमित शाह भाजपचे चाणक्य म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.

मुंबईच्या एका सर्व संपन्न गुजराती जैन कुटूंबात अमित शाह यांचा जन्म झाला. आज ते देशाचे गृहमंत्री आहेत. जितकं त्यांचं राजकीय आयुष्य चर्चेत राहलं तितकीच त्यांची पर्सनल लाइफही चर्चेत राहली. आज आपण व्हॅलेंटाईन दिवसानिमित्त अमित शाह यांच्या वैवाहीक आयुष्याविषयी आणि त्यांच्या पत्नीविषयी जाणून घेणार आहोत. (bjp leader Minister of Home Affairs amit shah and sonal shah love story married life kolhapur )

आज आम्ही तुम्हाला भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांची अनोखी प्रेम कहानीविषयी सांगणार आहोत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अमित शाह हे त्यांच्या पत्नी सोनल यांना पाहून पहिल्या नजरेतच त्यांच्या प्रेमात पडले.

अमित शाह यांनी वयाच्या 23 व्या वर्षी लग्न केले. त्यांची पत्नी सोनल शाह यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. अमित शाह यांनी खरं तर अरेंज मॅरेज केलंय मात्र सोनल यांना पहिल्यांदा पाहल्यानंतरच ते त्यांच्या प्रेमात पडले होते.

सोनल यांचा जन्म कोल्हापुरमध्ये झाला होता. सोनल यांनी राजकुमारी पद्मराजे गल्र्स हाय स्कूल, कोल्हापुर येथून आपले शिक्षण घेतले. येत्या येत्या १९ तारखेला अमित शहा त्यांच्या पत्नीच्या शाळेला भेट देणार आहे.

सोनल यांचं शाळेसोबत अनोखं नातं

शाळा सोडल्यानंतर सोनल या तब्बल ३५ वर्षांनंतर मैत्रिणींचा मेळा भरला असताना आल्या होत्याय या प्रसंगी त्यांनी शाळेला पाच लाखांचा धनादेश दिला होता. पद्माराजे हायस्कूल त्यांच्यासाठी दुसरे घरच आहे. शिक्षिकांनी केलेल्या संस्कारांमुळेच त्या एक उत्तम चांगली गृहिणी होऊ शकल्या, असं त्या नेहमी म्हणतात.

सोनल आणि अमित शाह यांच्या ३७ वर्षाच्या संसारात अनेक चढ उतार आले. मग ते राजकीय असो की वैयक्तिक आयुष्यात सोनल या नेहमी खंबीरपणे अमित शाह यांच्यासोबत उभ्या राहल्या. या दोघांना एक मुलगा आहे, जय शाह. जय हे सध्या बीसीसीआयचे सचिव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : कोयता गँग पुन्हा सक्रिय, 12 वीच्या विद्यार्थ्यावर हल्ला

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT