Ravi Shankar Prasad vs Mehbooba Mufti esakal
देश

UK PM : ऋषी सुनक PM होताच मेहबूबा मुफ्तींचं ट्विट; भाजप चांगलंच भडकलं, म्हणालं.. 'तुम्ही अल्पसंख्याक'

'दुर्दैवानं काही भारतीय नेते या निमित्तानं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत हे खेदजनक आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'दुर्दैवानं काही भारतीय नेते या निमित्तानं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत हे खेदजनक आहे.'

Rishi Sunak British PM : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होत आहेत. याबाबत मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी ट्विट करुन त्यांचं कौतुक केलंय. अल्पसंख्याक असलेल्या ऋषी सुनक यांना यूकेमध्ये (UK PM) पंतप्रधान बनवलं जात आहे, तर भारतात आम्ही अजूनही एनआरसी आणि सीएए सारख्या विभाजनकारी आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांनी बांधील आहोत, असं म्हटलंय.

या ट्विटनंतर भाजप खासदार रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी पलटवार केलाय. मेहबूबा मुफ्ती ह्या जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) अल्पसंख्याक मुख्यमंत्री स्वीकारतील का? असा सवाल केलाय. मेहबूबा मुफ्तींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, यूकेमध्ये भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान असतील, हा अभिमानाचा क्षण आहे. यूकेनं अल्पसंख्याक सदस्याला पंतप्रधान म्हणून स्वीकारलं आहे, तरीही आम्ही NRC आणि CAA सारख्या विभाजनकारी आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांनी बांधील आहोत, असं त्यांनी नमूद केलंय.

रविशंकर प्रसाद यांचा पलटवार

माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत मेहबुबा मुफ्तींवर जोरदार निशाणा साधलाय. मेहबुबा मुफ्ती, तुम्ही जम्मू-काश्मीरमधील कोणत्याही अल्पसंख्याकांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी स्वीकाराल का? असा सवाल केलाय. पुढील ट्विटमध्ये रविशंकर प्रसाद यांनी लिहिलंय की, ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर काही नेते बहुसंख्यवादाच्या विरोधात सक्रिय झाले आहेत. मी त्यांना एपीजे अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षांच्या असाधारण कारकिर्दीची आठवण करून देऊ इच्छितो. आता आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू आमच्या राष्ट्रपती आहेत, असं सडेतोड प्रत्युत्तर रविशंकर यांनी मुफ्तींना दिलं. रविशंकर प्रसाद यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिलंय, 'भारतीय वंशाचे सक्षम नेते ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होत आहेत. या अभूतपूर्व यशाबद्दल आपण सर्वांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. दुर्दैवानं काही भारतीय नेते या निमित्तानं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत हे खेदजनक आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT