bjp leader vineet agrawal
bjp leader vineet agrawal 
देश

Loksabha 2019 : 'कमळ' म्हणताना धाप लागली पण नाही थांबले ते...

वृत्तसंस्था

लखनौः मेरठमधील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विनित अग्रवाल हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. यामागील कारण म्हणजे त्यांनी 17 सेकंदात 27 वेळा कमळ, कमळ... असा उच्चार केला. कमळ, कमळ म्हणताना त्यांना धाप लागली पण ते थांबले नाहीत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या प्रचार सभेत विनित अग्रवाल यांनी मोठ्या उत्साहात भाषण केले. भाषण करताना त्यांनी 17 सेकंदांत 27 वेळा कमळ म्हणणाऱ्या विनित अग्रवाल यांनी शेवटच्या 18 सेकंदांतही 6 वेळा कमळ शब्द उच्चारला. प्रचारसभेत केलेले भाषण चर्चेत आले आहे. मोदी सरकारचे गुणगान गात त्यांनी भाजपसाठी मतांचा जोगवा मागताना त्यांचा उत्साह प्रचंड वाढला कमळ, कमळ म्हणताना धाप लागली पण ते थांबले नाहीत. कमळासमोरचे बटण एवढे दाबा की मोदी रामाच्या रूपात प्रकट झाले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांचे उत्साहातील भाषण ऐकून सगळेच अवाक झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा देशभर उडू लागला आहे. अनेक नेत्यांच्या सभा विविध कारणांमुळे गाजू लागल्या आहेत. आपले भाषणकौशल्य दाखवण्यासाठी अनेक नेते नवनवे प्रयोग करताना दिसतात. एक 'ब्रेथलेस' प्रयोग उत्तर प्रदेशात पाहायला मिळाला. कमळ, कमळ म्हणाताना नेत्याचा आविर्भाव पाहून अनेकांना हसू आवरत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT