BJP list for Rajya Sabha election Opportunity for these leaders read esakal news
BJP list for Rajya Sabha election Opportunity for these leaders read esakal news  Sakal
देश

राज्यसभेसाठी भाजपाची संभाव्य यादी; या नेत्यांना संधी?

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने उत्तर प्रदेशासाठीची संभाव्य उमेदवार यादी दिल्लीत मागवून घेतली आहे. यात सपातून आलेले नरेश आगरवाल, माजी भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी, प्रदेश महामंत्री प्रियांका रावत आदी नव्या चेहऱयांना यंदा स्थान मिळण्याची चिन्हे आहेत. राज्यातील ११ पैकी ७ ते ८ जागा भाजप जिंकू शकणार आहे. त्यादृष्टीने पक्षाने एक संभाव्य यादी तयार केली आहे. १० जून रोजी राज्यसभा निवडणूक आहे. उमेदवारी भरण्याच्या खएरच्याच दिवसी भाजप महत्वाच्या उमेदवारंची नावे जाहीर करेल असे पक्षसूत्रांनी सांगितले.

राज्यसभेबाबतच्या नावांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱयावरून परतल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केली. राज्यसभा उमेदवार निवडताना मोदी-शहा केवळ जुलैतील राष्ट्रपती निवडणूकच नव्हे तर २०२४ मधील लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने उमेदवारांची निवड करणार हही स्पष्ट आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा व विधान परिषदेतील संख्याबळ पहाता भाजपला ८ व सपाला ३ जागा सहज मिळू शकतात. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांत समन्वय झाल्याचे समजते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुकाणू समितीची बैठक नुकतीच झाली. तीत एक संभाव्य यादी तयार करून दिल्लीला पाठविण्यात येणार आहेत व त्यानंतर योगी यांच्याशी चर्चा करून भाजप अंतिम उमेदवार जाहीर करेल.

सध्याच्या खासदारांपैकी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचीही उमेदवारी पक्की समजली जाते. उर्वरीत पाच जागांसाठी सध्याचे शिवप्रताप शुक्ला, संजय सेठी, सुरेंद्र नागर, जयप्रकाश सेठी, सैय्यद जफर इस्लाम या खासदारांचीही नावे राज्य सुकाणू समितीने कायम ठेवली असून अंतिम निर्णय केद्रीय नेतृत्वावर सोडण्यात आला आहे.

दरम्यान सपाकडून सध्याचे रेवतीरमण सिंंह यांच्यासह तीनही खासदार पुन्हा राज्यसभेवर येणार नाहीत. ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कपील सिब्बल यांच्यासह तीन नवीन चेहरे राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय सपा नेते खिलेश यादव यांनी घेतला आहे. मात्र खुद्द कॉंग्रेसची पाटी यावेळी यूपीतून कोरीच रहाणार आहे.

चिदंबरम यांनाच पुन्हा संधी ?

दरम्यान केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविणे भाजपसाठी अपरिहार्य आहे. काॅंग्रेसतर्फे महाराष्टातून एकमेव जागेसाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यासह मिलिंद देवरा व संजय निरूपम यांच्या नावावर काॅंग्रेस हायकमांड गंभीरपणे विचार करत आहे. चिदंबरम यांना तमिळनाडूतून संधी मिळाली तर काॅंग्रेसतर्फे महाराष्ट्रातील नेत्याला संधी मिळू शकते. भाजपच्या वतीने दुसऱया नावासाठी सध्याचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुधदे की अन्य कोणा कार्यकर्त्याला संधी द्यायची याचा निर्णय राज्य नेतृत्व (देवेंद्र फडणवीस) घेतील. भाजपने तिसरी जागा लढविण्याचे ठरविल्यास तेथे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या एका नेत्याच्या नावावर विचार सुरू असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT