Sameer Wankhede Team eSakal
देश

"समीर वानखेडेंसाठी भाजप नेत्यांकडून दिल्लीत लॉबींग"

नवाब मलिकांनी फोडला 'ऑडिओ बॉम्ब'; समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

सुधीर काकडे

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासाठी महाराष्ट्रातील मोठे भाजपनेते (Delhi) दिल्लीत लॉबींग करताय असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी (Nawab Malik) आज केला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या नवाब मलिक यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यासह भाजपवरही (BJP) गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यासाठी महाराष्ट्रातील भाजपनेते दिल्लीत लॉबींग करत असल्याचा आरोप केला.

समीर वानखेडे यांचा एनसीबी प्रमुख पदाचा कार्यकाळ संपला आहे. आपण मुदतवाढ मागत नसल्याचं समीर वानखेडे म्हणाले. मात्र भाजपचे काही मोठे नेते त्यांना इथे ठेवण्यासाठी दिल्लीत गृह विभागात लॉबींग करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला. त्यामुळे या वसुली गँगमध्ये भाजपचाही वाटा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत जर वानखेडे इथे राहीलेच तर मी त्यांचे आणखी फर्जीवाडे समोर आणेल असं नवाब मलिक म्हणाले.

एनसीबीने या प्रकरणात योग्य कारवाई न केल्याचा आरोप करत त्यांनी NCB फर्जीवाड्याची मर्यादा ओलांडत असल्या आरोप केला. नवाब मलिक म्हणाले. के.पी. गोसावी, भानूशाली, बोगस कागदांवर सही घेणे, खोटे पंच तयार करणे हे सर्व फर्जीवाडे समोर आणल्यावर एनसीबीने चौकशी समिती स्थापन केली मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नसल्याचं दिसतंय. त्यामुळे आपण आणखी फर्जीवाडे बाहेर काढू आणि या प्रकरणाचा लॉजीकल एंड करू असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद राहणार?

Thane News: भाईंदर-ठाणे प्रवास होणार वेगवान! कॉरिडॉर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ट्रॅफिक जामला ब्रेक मिळणार, कसा असेल मार्ग?

Europe Heatwave: युरोपची लाहीलाही! उष्णतेच्या लाटेत होरपळले अनेक देश, १८ शहरांना रेड अलर्ट; फ्रान्समध्ये ५ दिवसात १ हजार मृत्यू

Water Palaces: ऐतिहासिक सौंदर्याचा नजराणा ! भारतातील ५ सर्वात सुंदर 'वॉटर पॅलेस' पाहिलेत का ?

Latest Marathi News Live Update: विधानसभेत 'पश्चिम बंगाल सार्वजनिक सुरक्षा आणि समाजकंटक कारवायांवरील नियंत्रण विधेयक, २०२६' मंजूर करण्यासाठी मतदान सुरू

SCROLL FOR NEXT