political  esakal
देश

भाजप सदस्यत्वाचा राजीनामा; उत्पल पर्रिकरांचे नारायण राणेंना पत्र

उत्पल पर्रिकरांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातील पाच महत्वाच्या राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. मात्र यातील गोव्यातील विधानसभेसाठी अनेक नाट्यमय घडामोडी सध्या चर्चेत आहेत. भाजपने (BJP) गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ३४ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना तिकीट देण्यात आलेलं नाही. यावरून सत्ताधारी नेत्यांची भाजपावर टीका सुरु आहे. दरम्यान आता पणजीतून (Panaji) अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजप सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारावा. आतापर्यंत आपण केलेल्या सहकार्याबद्दल आभार, असं त्यांनी नारायण राणेंना (Narayan Rane) लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. भाजपाचा बिचोलीतून उमेदवारी घ्यावी हा प्रस्ताव उत्पल पर्रिकर यांनी नाकारला आहे. आता ते पणजीतून अपक्ष लढणार आहेत. तशी घोषणा त्यांनी काल केली आहे. उत्पल पर्रिकरांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधणा आलं आहे. माझी भूमिका ठाम आहे, मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही अशी भूमिका उत्पल पर्रिकरांनी या आधीच मांडली होती.

गोव्यासाठी भाजपकडून 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली. पणजी गोव्याची राजधानी पणजी राजकारणात कायम केंद्रस्थानी राहिली आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा हा मतदारसंघ आहे. उत्पल पर्रिकर पणजीतूनच विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम होते. भाजपकडून उत्पल यांना अन्य दोन पर्याय देण्यात आले होते. मात्र, ते त्यांना मंजूर नव्हते. त्यांच्या या निर्णयामुळे गोव्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार आणि भाजपाची पुढची खेळी काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT