भाजप
भाजप  sakal
देश

BJP : भाजप आमदारांचे वर्चस्व पणाला

अभय दिवाणजी

संपूर्ण राज्यभरात चर्चेत असलेल्या तसेच प्रचंड चुरशीच्या ठरू लागलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाची सारी भिस्त भाजपच्या चार आमदारांवर राहणार आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते हे राज्याचे भाजपचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘किचन कॅबिनेट’ म्हणून ओळखले जातात. फडणवीस यांच्यासाठी, पक्षासाठी तसेच आगामी विधानसभेच्या गणितांसाठी या चारही आमदारांना आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.

या मतदारसंघातील सहापैकी पाच मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व आहे. शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट व पंढरपूर-मंगळवेढा या चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. या गणितातून भाजपला विजयाची खात्री वाटत असली तरी या चारही आमदारांच्या निष्ठेची परीक्षा निवडणुकीत होणार आहे.

भाजप उमेदवाराच्या मताधिक्यावरच त्यांचे भवितव्य ठरणार आहे. मोहोळ मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यामुळे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे वर्चस्व असल्याचे दिसत असले तरी राजकीय वातावरण, शेतकऱ्यांची व मराठा समाजाची भूमिका तसेच मोहिते-पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातील प्रवेश, यातून गणित कसे जुळेल, हे पहावे लागणार आहे.

काही अपवाद वगळता भाजपच्या विजयाचे गणित तिसऱ्या उमेदवारावर अवलंबून असल्याचा इतिहास आहे. यावेळी एमआयएम आणि ‘वंचित’चा मतांच्या आकडेवारीतील निर्णायक ठरणारा तो तिसरा ‘बाजीगर’ कोण, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी काँग्रेसच्या गोटातून आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. तरुणाईचा कल अजूनही मोदींकडे असल्याचे दिसत आहे. तसेच भाजपच्या चारपैकी दोन आमदार लिंगायत तर दोन मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे जातीय समिकरणात भाजप ‘प्लस''मध्ये आहे.

माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या २०१४ व २०१९ या दोन निवडणुकांतील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते किल्ला लढवित आहेत. दोघेही उच्च विद्याविभूषीत असल्याने प्रचार यंत्रणेत सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत आहे. दोन्ही बाजूंनी पारंपरिक मतदारांबरोबरच तरुणाईला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. निवडणुकीच्या सुरवातीला वैयक्तिक टिकाटिपण्णीवर भर दिलेल्या दोन्ही उमेदवारांकडून गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यांवर प्रचाराची राळ उठविली जात आहे. सध्यातरी दोघांमध्ये कडवी लढत पहावयास मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या एकमेव आमदार असलेल्या प्रणिती शिंदे याचा विजय झाला, तर ‘शहर मध्य’मधून आपल्याला उमेदवारी मिळेल, या आशेने देव पाण्यात ठेवून बसलेल्या इच्छुकांना धक्का बसला आहे. कारण काँग्रेसने ‘शहर मध्य’मधून विधानसभेसाठी माकपचे कॉ. न. ना. आडम मास्तर यांना शब्द दिल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

काँग्रेसच्या जमेच्या बाजू

सुशीलकुमार शिंदे यांची कन्या

तीन टर्म आमदारकीचा अनुभव

केंद्र सरकारविरोधी वातावरण

शेतकरी, मराठा समाजाची सरकारवरील नाराजी

चिमणीचे पाडकाम, विमानसेवेचा मुद्दा

माजी आमदार आडम, दिलीप माने यांची साथ

भाजपच्या जमेच्या बाजू

पंतप्रधान मोदींचा विकासाचा अजेंडा

दळणवळणाच्या सुविधांतून विकास

स्मार्ट सिटी, समांतर जलवाहिनी, वंदे भारत ट्रेन, पासपोर्ट कार्यालय

मतदारसंघात ओबीसी समाज एकटविण्याची शक्यता

केंद्र, राज्याची शेतकऱ्यांना थेट मदत

खा. धनंजय महाडीक राजन पाटील, परिचारकांच्या वर्चस्वाचा लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT