bjp mp pragya thakur taken girl to watch The kerala Story elopes with her muslim lover  
देश

Pragya Singh Thakur : असं कसं हो साध्वी? जिला 'द केरळ स्टोरी' दाखवली तीच मुस्लीम प्रियकरासोबत गेली पळून

रोहित कणसे

'द केरळ स्टोरी' हा चित्रपट दाखवण्यासाठी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सिनेमागृहात नेलेल्या १९ वर्षीय तरुणी लग्न तोंडावर आलेला असतानाच तिचा प्रियकर युसूफसोबत पळून गेली आहे. महत्वाचे म्हणजे या मुलीला प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यूसुफपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. तिचे खास मतपरिवर्तन करण्यासाठी त्या मुलीला 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट पाहायला घेऊन गेल्या होत्या.

चित्रपटात काय आहे?

केरळ स्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की कसेप्रेमाचा जाळ्यात ओढून हिंदू मुलींचं इस्लाम स्विकारण्यासाठी ब्रेनवॉश केलं जातं. त्यानंतर त्यांना सीरियाला पाठवलं जातं जेथे त्या दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या जाळ्यात अडकतात. या चित्रपटाची देशभरात चर्चा झाली होती.

प्रकरण काय आहे?

मध्यप्रदेशातील भोपाळच्या बसेरा परिसरात राहाणाऱ्या मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार यूसुफ त्यांच्या शेजारी राहतो. दरम्यान ३० मे रोजी या तरुणीचं लग्न होणार होतं. मात्र याआधीच ती यूसुफसोबत पळून गेली. कुटुंबुयांनी सांगितलं की, ती लग्नासाठी घरात आणून ठेवलेली रोकड आणि दागिने देखील घेऊन गेली आहे. दरम्यान भोपाळच्या कमला नगर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार कुटुंबियांनी आरोप केला आहे की यूसुफने त्यांच्या मुलीला गोड बोलून फूस लावली आणि तिला घेऊन फरार झाला.

त्यांनी असाही आरोप केला आहे की, यूसुफने त्यांच्या मुलीच्या नावे बँकेतून कर्ज घेतलं आणि तिला ईएमआय भरण्यास भाग पाडले. मात्र कुटुंबियांनी केलेले आरोप फेटाळून लावत मुलीने पोलिसांसमोर सांगितलं की ती तिच्या मर्जीने यूसुफ सोबत पळून गेली. यूसुफ हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर अर्धा डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

भाजप खासदार काय म्हणाल्या..

यादरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुलींनी लव्ह जिहादपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या मुलींनी जागृक होण्याची गरज आहे. आपल्या लहान मुली ज्या निरागस आहेत, त्यांना सध्या लक्षात येत नाहीये. पण त्यांच जीवन सुरक्षित नाहीये. त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी मी खंबीरपणे पुढे येईल, येत राहीन. लव्ह जिहादच्या फंदात पडू नका आणि आईवडिलांचा आदर करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax law : १ एप्रिल २०२६ पासून मोदी सरकार तुमच्या फोनमधील मेसेज चेक करणार? नव्या Income Tax कायद्यामागचं सत्य काय?

Leopard: शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या पुन्हा-पुन्हा का येतो? माणसाने कोणती काळजी घेतली पाहिजे?

Latest Marathi News Live Update : वाहन चालकाला डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गावर अपघात, महिला जखमी

Shashikant Shinde : पक्षाचे हित महत्त्वाचे; सन्मानजनक प्रस्तावासह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर निर्णय होईल- शशिकांत शिंदे!

Pune Police Rescue : बाणेरमधील लॉजवर पोलिसांची धडक; महिलांची सुटका; व्यवस्थापकासह चार आरोपी अटकेत!

SCROLL FOR NEXT