bjp mp ravi kishan said blame congress for having 4 childrens over population control bill rak94 
देश

Ravi Kishan : मला चार मुलं झाली हा कॉंग्रेसचा दोष; भाजप खासदाराचं अजब वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

Ravi Kishan On Population Control Bill : सध्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर देशात चर्चा सुरू आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. या दरम्यान, भाजप खासदार रवी किशन यांनी वाढत्या लोकसंख्येचा ठपका काँग्रेसवर ठेवला आहे. काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणले असते तर आज मी 4 मुलांचा बाप नसतो, असे अभिनेते-राजकारणी रवी किशन यांनी म्हटले आहे. यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उत्तरप्रदेशमधील गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी काँग्रेसवर आरोप केला की, ते चार मुलांचे वडील आहेत आणि वाढत्या लोकसंख्येची अडचण त्यांना कळते. आजतक च्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, मला चार मुले आहेत, ही काही चूक नाही. काँग्रेस सरकारने विधेयक आणले असते, कायदा असता तर आम्हाला चार अपत्ये झाली नसती.

हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

काँग्रेस सरकारचा दोष

आधीच्या सरकारने या बाबतीत सावधगिरी बाळगायला हवी होती, लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा केला असता तर त्यांना चार अपत्ये झाली नसती, असे ते म्हणाले आहेत. काँग्रेसच्या काळात लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नाही, त्यामुळे आता भाजप सरकारला लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणावे लागले आहे असेही त्यांनी म्हटले.

यासंदर्भात संसदेत प्रस्ताव मांडणार असल्याचेही रवी किशन यांनी सांगितले. यासोबतच त्यांनी कबूल केले की त्यांनी जेव्हा लोकसंख्या नियंत्रणाचा विचार केला, तेव्हा त्यांना चार मुले झाल्याचा पश्चात्ताप झाला असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, चीनने लोकसंख्या नियंत्रित केली आहे. आपल्या देशातील पूर्वीची सरकारे विचारशील असती तर पिढ्याना त्रास झाला नसता. पुढे बोलताना भाजपचे खासदार रवी किशन म्हणाले की, सध्याचे भाजप सरकार केवळ मंदिरेच बांधत नाही तर रस्तेही बांधत आहे. ते म्हणाले की जेव्हा कॉरिडॉर बनवला जात आहे तेव्हा एम्स देखील बांधले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT