Karnataka Lok sabha 
देश

Karnataka Lok sabha: कुमारस्वामींचे एनडीएमध्ये स्वागत; भाजप-जेडीएस युतीची जेपी नड्डा यांच्याकडून घोषणा

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जनता दल सेक्युलर पक्षाचा समावेश झाल्याचं भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जाहीर केलं. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर भाजप आणि जेडीएसची युती झाल्याचे जेपी नड्डा यांनी जाहीर केलं. यासंदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट केलीये.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची भेट झाली. यावेळी वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही उपस्थित होते. मी आनंदी आहे की, कुमारस्वामी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचे एनडीएमध्ये स्वागत करतो, असं जेपी नड्डा म्हणाले.

एचडी कुमारस्वामी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट झाली. भाजपसोबत युती करण्याबाबत आम्ही प्राथमिक चर्चा केली. आम्ही काही प्राथमिक मुद्दे मांडले आहेत. आमच्याकडून कोणतीही मागणी नाही.' कुमारस्वामी गुरुवारी नवी दिल्लीत आले होते. त्यामुळे शुक्रवारी भाजप-जेडीएस युतीची औपचारिक घोषणा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं.

कर्नाटकमध्ये लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने २५ जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकमध्ये जेडीएससोबत युती करणार असल्याचे सुतोवाच भाजप नेते बीएस येडीयुरप्पा यांनी केले होते. जेडीएसला ४ जागा देण्याबाबत निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, जेडीएसकडून याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलेले नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: थेरगाव येथील तरुणांची ध्येयाला गवसणी; शेतकरी कुटुंबातील तीन मुलांची मुंबई पोलिस दलात निवड

मुख्याध्यापकांना सापडेनात कागदपत्रे! शिक्षण आयुक्तांनी दिली १५ दिवसांची मुदतवाढ; वेतन अधीक्षकांकडून मुख्याध्यापकांना ‘हा’ इशारा; कोट्यवधींचा घोटाळा उजेडात येणार

Panchang 30 August 2025: आजच्या दिवशी ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pune News : सर्वसमावेशक युद्धतंत्र विकसित व्हावे; विनोद खंदारे

अग्रलेख : झळांच्या व्हाव्या झुळका

SCROLL FOR NEXT