BJP Nupur Sharma and Naveen Jindal Controversial Statements About Muhammad arrest both mamata banerjee tweet sakal
देश

शर्मा, जिंदाल यांना अटक करा : ममता बॅनर्जी

बॅनर्जी यांनी यासंदर्भात अनेक ट्विट केले.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत दोघांनाही तत्काळ अटक करण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरद्वारे केली. अशा प्रकारच्या वक्तव्यातून केवळ हिंसाचारच घडत नाही तर सामाजिक विभाजनही होते, असे सांगत सर्व जातीधर्माच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. बॅनर्जी यांनी यासंदर्भात अनेक ट्विट केले.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की भाजपच्या काही नेत्यांनी नुकतेच केलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्याचा मी निषेध करते. अशा वक्तव्यातून केवळ हिंसाचारच पसरत नाही तर देशाचे एकतेचे विभाजन होऊन शांतता आणि सौहार्दाचे वातावरणही बिघडते. त्यामुळे, प्रेषित पैगंबरांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल या भाजपच्या माजी नेत्यांना अटक करण्यात यावी. त्यामुळे, देशाचे ऐक्य भंग पावणार नाही. तसेच लोकांना मानसिक त्रासही सहन करावा लागणार नाही, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन सर्व जातीधर्माच्या लोकांनी चिथावणी दिल्यानंतरही शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले. शर्मा आणि जिंदाल यांच्या वक्तव्याचे इस्लामिक देशांत तीव्र पडसाद उमटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT