Subramanian Swamy esakal
देश

भाजपच्या संसदीय मंडळातून गडकरींना हटवलं; स्वामी म्हणाले, आता मोदींच्या इच्छेनं..

भाजपच्या संसदीय मंडळात मोठा बदल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भाजपच्या संसदीय मंडळात मोठा बदल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) संसदीय मंडळात (BJP Parliamentary Board) बुधवारी मोठा बदल करण्यात आला आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांना संसदीय मंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी ट्विट करून भाजपच्या जुन्या परंपरेची आठवण करून दिलीय. स्वामींनी ट्विट करून लिहिलंय, "सुरुवातीच्या काळात जनता पक्ष होता, तो आता भारतीय जनता पक्ष झाला आहे. पूर्वी संसदीय पक्षाच्या निवडणुका झाल्या, ज्याद्वारे पदाधिकारी निवडले गेले. पक्षाच्या घटनेनुसार, तसं करणं आवश्यक होतं. मात्र, आज भाजपमध्ये कुठंही निवडणूक नाही. प्रत्येक पदाची निवड नामनिर्देशनाच्या आधारे केली जाते आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची मंजुरी घ्यावी लागते."

एका युजर्सनं ट्विट करून विचारलं की, पक्षात लोकशाही नाही, अशा स्थितीत ते देशातील लोकशाही कशी वाचवतील? यावर स्वामींनी लिहिलंय की, 'तुम्हाला आता कळलं आहे. भाजपचे संसदीय मंडळ पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेते, त्यामुळं त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत शिवराज सिंह चौहान आणि नितीन गडकरी यांना वगळणं धक्कादायक आहे.'

8 वर्षांनंतर मोठा बदल

तब्बल 8 वर्षानंतर भाजपच्या उच्च पातळीवर मोठे बदल झाले आहेत. प्रादेशिक समतोल राखण्यासाठी आणि जातीय समतोल राखण्यासाठी हा बदल केल्याचं मानलं जातंय. पक्षाचे माजी अध्यक्ष संसदीय मंडळात राहतात, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. माजी सभापती राजनाथ सिंह, माजी सभापती अमित शहा हे संसदीय मंडळाचे सदस्य आहेत. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर नितीन गडकरी त्यातून बाहेर फेकले गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT